चालू घडामोडी - ३१ ऑगस्ट २०१७

Date : 31 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फक्त एक टक्के नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत आकडेवारी जाहीर :
  • रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून, बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे ९९ टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्या असून केवळ १ टक्का नोटा जमा झालेल्या नाहीत.

  • रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या ६,७०० दशलक्ष नोटांपैकी फक्त ८९ दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत, बंद नोटांच्या स्वरूपात चलनात असलेल्या १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळाले आहेत.

  • १ हजार रुपयांच्या १.३ टक्के नोटा बँकांत जमा झालेल्या नसून त्यांची किंमत ८.९ कोटी रुपये असून या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला आहे.

  • १ टक्का रकमेसाठी नोटाबंदी लागू करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडविली, त्यांनी म्हटले की, बंद करण्यात आलेल्या नोटांच्या स्वरूपात १५,४४,००० कोटी रुपये चलनात होते.

  • त्यापैकी फक्त १६,००० कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळालेले नाहीत. याचा अर्थ नोटाबंदीतून रिझर्व्ह बँकेला काळ्या पैशाच्या स्वरूपात १६,००० कोटी रुपयांचा लाभ झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्‍समध्ये सहभागी होणार : ३ ते ५ सप्टेंबर
  • पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच द्विपक्षीय म्यानमार दौरा आहे, यापूर्वी २०१४ मध्ये असियान शिखर संमेलनासाठी म्यानमारला गेले होते, या दौऱ्यादरम्यान मोदी स्टेट काऊन्सिलर डॉ आंग सान सू की यांच्यामवेत चर्चा करणार आहेत.

  • ३ ते ५ सप्टेंबर रोजी चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्‍स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने शियामेन दौऱ्याची माहिती देण्यात आली.

  • परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीन अध्यक्षाच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या ब्रिक्‍स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनच्या फजियान प्रांतातील शियामेन येथे जाणार आहेत.

  • डोकलामवरून निर्माण झालेला भारत-चीन यांच्यातील वाद २८ ऑगस्ट रोजी सैन्य माघारीच्या निर्णयानंतर निवळलेला असताना मोदींच्या चीन दौऱ्याची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.

  • चीन दौरा आटोपल्यानंतर मोदी ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान म्यानमार देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. म्यानमारचे अध्यक्ष यू थिन क्वा यांच्या निमंत्रणावरून मोदी जात आहेत.

कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी दिली महापालिकेला भेट :
  • कर्नाटक राज्यातील दावणगेरे महापालिकेच्या महापौरांसह लोकप्रतिनिधींनी महापालिकेला भेट दिली असून या वेळी त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून पालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली.

  • शहरात यशस्वीरीत्या राबवलेल्या अनेक लोकोपयोगी प्रकल्पांमुळे नवी मुंबई महापालिकेचा नावलौकिक वाढला असून यामुळे देशभरातील विविध महापालिकांच्या लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ नवी मुंबईला भेट देत आहे.

  • यानुसार मंगळवारी कर्नाटकातील दावणगेरे महापालिकेच्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिकेला भेट दिली.

  • दावणगेरे महापालिकेच्या महापौर अनीता मालथेश, महसूल समिती सभापती एस. एस. बसप्पा, स्थायी समिती सभापती दिलशा अहमद, जी. बी. लिंगराजू, एच. बी. गोणप्पा यांच्यासह सुमारे ३० लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

  • महापौर सुधाकर सोनवणे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करत पालिका मुख्यालगत बैठकीतून चर्चा केली.

रोहिणी भाजीभाकरे सेलम जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी : 
  • रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी मुदुराई जिल्ह्यात माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 'मनरेगा' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • तमिळनाडू राज्यातील मदुराई येथे कार्यरत असलेल्या उपळाई बुद्रूकच्या कन्या तथा अप्पर जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांची नुकतीच सेलम जिल्ह्याच्या (तमिळनाडू) जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

  • रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या २००८ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ११८ व्या क्रमांकाने आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या होत्या. प्रशिक्षणानंतर त्यांची तमिळनाडू राज्यात नियुक्ती करण्यात आली होती.

  • मदुराई जिल्ह्याच्या सहायक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व तिरूमेलवेली च्या उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते 'स्वच्छता चॅम्पियन्स' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, सेलम जिल्ह्याच्या त्या १७१ व्या जिल्हाधिकारी आहेत.

  • त्यांची प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तमिळनाडू सरकारने त्यांना सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

हजारो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीच निकालाची आजची डेडलाइनही चुकणार :
  • पेपर तपासणीसाठीचा ३१ आॅगस्ट शेवटचा दिवस उजाडूनही, अद्याप विद्यापीठाने ३७ निकाल जाहीर केलेले नाहीत, त्यामुळे मुंबई विद्यापीठ एका दिवसांत ३७ निकाल जाहीर करण्याचा चमत्कार करणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

  • मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाच्या तीन डेडलाइन चुकविल्या आहेत. न्यायालयात दिलेली ३१ आॅगस्टची डेडलाइन तरी मुंबई विद्यापीठ पाळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

  • मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर न केल्यास, विद्यार्थी संघटना सक्रिय होणार असून ‘मुंबई विद्यापीठ वाचवा’ मोहिमेला सुरुवात करणार आहेत.

  • मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे मुंबई दिवसभर ठप्प झाली होती. अनेक जण बुधवारी घरी गेले, पण मुंबई विद्यापीठावर असलेल्या निकालाच्या तणावामुळे प्राध्यापकांनी दोन्ही दिवशी हजेरी लावली.

  • मंगळवारीही कमी प्रमाणात हा होईना, पण उत्तरपत्रिकांची तपासणी झाली. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ आॅगस्टचा दिवस उजाडूनही विद्यापीठाला हजारो उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करायची आहे.

  • परीक्षा संपून जवळपास साडेतीन महिने पूर्ण झाले असले, तरी अजूनही विद्यार्थ्यांच्या हाती निकाल पडलेले नाहीत, परीक्षा संपल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल लावण्याचा विद्यापीठाचा नियम विद्यापीठानेच मोडला.

राष्ट्रवादीचे खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाहीत : शरद पवार
  • मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत सहभागी होणार अशी चर्चा होती. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी झालेल्या यूपीएच्या बैठकीला पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कोणीही नेते उपस्थित राहिले नाहीत.

  • चर्चा काही असो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणीही खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाही, हे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्पष्ट करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी बुधवारी सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिमंडळातील चर्चेला पूर्ण विराम दिला.

  • पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली, तेव्हापासून या चर्चेला अधिक वेग आला होता, याबाबत फारसे भाष्य न करता पवार यांनी राष्ट्रवादीचे कोणीही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले.

  • राज्य सरकारच्या कर्जमाफीवर देखील पवार यांनी टीका केली. ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असे जाहीर केले जाते मात्र, राज्याच्या कानाकोपरात गेल्यावर एकही शेतकरी कर्जमाफ झाले आहे, असे ठामपणे सांगत नाही, असेही त्यांनी सांगितले.

  • भाजपाला सक्षम पर्याय नाही, हे देखील तितकेच खरे आहे. सध्या वेगवेगळे निर्णय घेतले जातात, त्याच अनुषंगाने लालूप्रसाद यादव सारख्या ‘मासबेस’ नेत्याने घेतलेली भूमिका, त्यांना मिळालेला पाठिंबा महत्त्वाचा आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • -

जन्म /वाढदिवस

  • ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या अमृता प्रीतम यांचा जन्म : ३१ ऑगस्ट १९१९

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • घाशीराम कोतवालला पेशव्यांनी जीवे मारले : ३१ ऑगस्ट १७९१

  • ब्रिटिश सम्राज्ञी डायनाचा पॅरीस येथे अपघाती मृत्यू : ३१ ऑगस्ट १९९७

ठळक घटना

  • रशिया व अमेरिका या देशांदरम्यान ’हॉट लाईन’ सुर करण्यात आली : ३१ ऑगस्ट १९६३

  • पुर्व व पश्चिम जर्मनी एकत्रितकरण करार : ३१ ऑगस्ट १९९०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.