चालू घडामोडी - ३१ जुलै २०१७

Date : 31 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'मन की बात' मध्ये आगामी पाच वर्षांचा अजेंडा : पंतप्रधान नरेन्द्र मोदीं
  • पंतप्रधान मोदी म्हणाले की,  ”महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ मध्ये ‘भारत छोडो’  आंदोलनाची सुरुवात केली. गांधीजींचं हे आंदोलन १९४२ ते १९४७ पाच वर्ष चाललं. या पाच वर्षांच्या काळात या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून २०१७ ते २०२२ पर्यंतचा अजेंडा देशवासियांसमोर मांडला. या पाच वर्षात देशवासियांनी अस्वच्छता, गरीबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवादाला मुठमाती देण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचं आवाहन केलं.

  • देशाला स्वतंत्र्य मिळून देण्यात या आंदोलनाची मोठी भूमिका आहे, आता या आंदोलनाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा दिवस देशवासियांनी संकल्प दिवस म्हणून साजरा करावा.”

  • पंतप्रधान पुढे म्हणाले की, ”या दिवशी देशवासियांनी अस्वच्छता, गरीबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवादाला मुठमाती देण्याचा संकल्प करुन, देशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी संकल्पबद्ध व्हावे,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

मुंबई विद्यापीठाचा 'निकाल' लागणार : सव्वातीन लाख उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक
  • मुंबई विद्यापीठाला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैची डेडलाइन दिली होती, पण ३० जुलैच्या रात्रीपर्यंत विद्यापीठाने केवळ १५३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केल्याने तब्बल ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल शिल्लक आहेत. 

  • मुंबई विद्यापीठाचे १५३ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, ९० टक्के  मूल्यांकन पूर्ण झाल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.

  • सव्वातीन लाख उत्तरपत्रिका अजूनही तपासलेल्या नसून आतापर्यंत विद्यापीठाने कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत.

  • आता एका दिवसात सव्वातीन लाख उत्तरपत्रिका तपासून ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करणे हे अशक्यप्रायच असल्याने मुंबई विद्यापीठाला देण्यात आलेली डेडलाइन चुकल्याचेच स्पष्ट होत आहे. 

जिल्हा ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा :
  • पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित जसमेल कौर आणि मंगला मळेकर स्मृती आयोजित जिल्हा ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ओम कांबळे, आकांक्षा गायकवाड, अनुष्का देशपांडे, पायल गोरे, अंकिता कोंडे, मनोज रावत, मेलविन थॉमस यांनी आपाल्या गटांमध्ये अव्वल स्थान पटकावले.

  • १६ वर्षांखालील मुलांच्या गटात डेक्कन जिमखान्याच्या ओम कांबळे याने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २४.६ सेकंद वेळ देत अव्वल क्रमांक पटकावला.

  • म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे.

  • उंच उडीत डेक्कनच्याच मनोज रावतने (१.७५ मीटर) बाजी मारली, ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत एएसएफचा सुमीत खर्बे, तर २००० मीटर धावण्याच्या शर्यतीत एसएसआयचा मोनू यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ नाहीच : सीबीडीटी
  • सीबीडीटीने शनिवारी आयटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात स्पष्ट नकार देताना, आयकर रिटर्न ३१ जुलैपर्यंतच भरावे लागतील, असं स्पष्ट म्हणलं आहे. याच्या मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही सीबीडीटीनं यावेळी स्पष्ट केलं आहे.

  • गेल्या काही दिवसांपासून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे, विविध व्यापारी संघटना आणि त्यांचे चार्टर्ड अकाऊंटन्ट यांच्याकडून देखील ही मागणी होत आहे.

  • पण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी)ने मुदतवाढीला स्पष्ट नकार दिला असून आतापर्यंत २ कोटी करदात्यांनी ऑनलाई पद्धतीनं रिटर्न फायलिंगची प्रक्रिया पूर्ण केलीय.

  • यावेळी रिटर्न फाईल करताना ९ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ पर्यंत 2 लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत भरली असल्यास, त्याची माहिती द्यावी लागणार आहे.

गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे ३० जुलै रोजी निधन :
  • हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

  • धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे ख्यातनाम गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (वय ७८ वर्षे) यांचे ३० जुलै रोजी निधन झाले.

  • देश-विदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या आहेत. अनेक शिष्यांनाही त्यांनी घडवले आहे. धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे खास कौशल्य त्यांच्याकडे होते.

  • डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफल रंगून जात असे, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

फेसबुक, इन्स्टाग्रामवर प्राप्तिकर विभागाची नजर : मोदी सरकारचा प्रॉजेक्ट इन्साइट
  • मोदी सरकारच्या कार्यकाळात बँक आणि पॅन कार्ड आधारशी जोडल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सोशल मीडियावरही नजर ठेवणार आहे.

  • फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नवीन कार किंवा परदेशातील भटकंतीचे फोटो शेअर करण्याची प्रत्येकालाच हौस असते, पण ही हौस तुम्हाला अडचणीतही आणू शकते, तुमच्या या फोटोंवर मित्रमंडळींसोबतच आता प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

  • प्राप्तिकर विभागाने सात वर्षात तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करुन ‘प्रॉजेक्ट इन्साइट’ राबवला जाणार असून जगातील सर्वात मोठा बायोमेट्रीक डाटाबेस तयार करण्यात आला असून प्रणालीच्या विकासासाठी एल अँड टी इन्फोटेक लिमिटेडची मदत घेण्यात आली आहे.

  • दागिने, नवीन कार, घर किंवा परदेश दौऱ्यांच्या फोटोंवर एका टीमकडून नजर ठेवली जाईल, वार्षिक उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसला नाही तर त्यांची चौकशी होईल.

न्यायालयाकडून मोहटा देवस्थानला माहिती अधिकार लागू :
  • मोहटा देवस्थान ट्रस्ट शासकीय अनुदान घेत असल्याने या देवस्थानला माहिती अधिकार लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा जिल्हा न्यायालयातील अपिलीय अधिकारी तथा जिल्हा न्यायाधीश एस.व्ही. माने यांनी दिला आहे.

  • अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीशांनी सन २०१५, २०१६ व २०१७ कार्यकाळात देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली.

  • ११ जानेवारीला देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीला विद्यमान अध्यक्ष सुवर्णा केवले या उपस्थित होत्या का ? याबाबतची माहिती जिल्हा न्यायालयाकडे माहिती अधिकारात मागण्यात आली होती.

  • जिल्हा न्यायाधीशांनी अध्यक्ष म्हणून या देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली, ही माहिती मागणारा अर्ज देवस्थानकडे वर्ग करण्याचा आदेशही माहिती अधिकार्‍याला देण्यात आला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • हरी पहलावान : मलेशिया.

जन्म, वाढदिवस

  • अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री : ३१ जुलै १९४१

  • लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू : ३१ जुलै १९१९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक : ३१ जुलै १९८०

  • पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान : ३१ जुलै १९७२

ठळक घटना

  • अपोलो १५च्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली : ३१ जुलै १९७१

  • न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला : ३१ जुलै १९४८

  • जपान एरलाइन्सची स्थापना : ३१ जुलै १९५१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.