मुलाखतीसाठी उपयुक्त अश्या १० गोष्ठी

Date : 2 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

.  मुलाखतीला जाण्यासाठी सर्वप्रथम स्वतःबद्दल विचार करायला हवा. माझं शिक्षण या जॉबसाठी योग्य आहे का ? हा जॉब करण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स माझ्यात आहेत का ? तुमच्या गरजा, आवडीनिवडी आणि नोकरी यांचा काही मेळ जमतोय का, या सर्वांचा विचार करायला हवा .

2. अर्ज करताना तुमचा बायोडेटा कसा आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. एका सर्वेक्षणानुसार येणाऱ्या बायोडेटांपैकी फक्त 15 टक्के बायोडेटांचाच मुलाखतीसाठी विचार केला जातो. काही बायोडेटा एवढे वाईट असतात की ते सरळ कचऱ्याच्या टोपलीत टाकले जातात बायोडेटाच्या झेरॉक्स काढून त्यावर स्वतःचं नाव टाकून पाठवणही चूक आहे हे देखील लक्षात ठेवा

3. त्या त्या जॉबनुसार तुमचा बायोडेटा तयार करुन घ्यायला हवा. बायोडेटा पाठवताना त्यावर व्यवस्थित लिहिलेले कव्हरिंग लेटर आवश्यक असतं. त्यामध्ये तुमच्या करिअरची, शिक्षणाची छोटीशी समरी असायला हवी.

4. बायोडेटा ई-मेलने पाठवताना वर्ड फॉरमेटमध्ये पाठवावा. सोबत कव्हरिंग लेटर स्वतंत्र टाईप करून पाठवावं.

5. बायोडेटा तयार केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात, त्या जॉबचं विश्लेषण करणं आवश्यक असतं. तुमचं व्यक्तिमत्व आणि करिअरची उद्दिष्ट नेहमी जुळायला हवीत .

6. निवडप्रक्रिया बऱ्याचदा सारखीच असते मुलाखतीचा पॅटर्नही ठरलेला असतो. जर तुम्ही फ्रेश असाल तर कदाचित वेगवेगळ्या टेस्ट,गटचर्चा आणि मुलाखतीच्या दिव्यातून तुम्हाला जावं लागतं. त्यासाठी वेगळी तयारी आवश्यक ठरते.

7. सर्व प्रश्नाची उत्तरे देऊनही आपली निवड का झाली नाही, हा प्रश्न पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आपल्याला माहित हवं की उमेदवारांमध्ये मुलाखत घेताना काय बघितले जाते?

8. मुलाखत दरम्यान उमेदवाराबद्दल महत्वाची माहिती घेतली जाते.

कौशल्य – व्यक्तीमध्ये काम करण्याचे कौशल्य कितपत आहे स्किल्स आहेत की नाही?

ज्ञान – नोकरी हवी त्या क्षेत्रातील माहिती कितपत आहे ? म्हणजे नॉलेज किती आहे .

चातुर्य – टॅलेंट ही मानसिक व्यवस्था आहे . विचार करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये तुमचे वर्तन विचाराची पद्धत, थॉट प्रोसेस तपासली जाते .

आणि मुख्य म्हणजे उमेदवार – हा उमेदवार हे काम करू शकेल का?-काम करण्याची त्याची इच्छाशक्ती आहे का? आणि तो संस्थेमध्ये /टीममध्ये स्वतःला योग्यपणे सामावून घेऊ शकेल का?- या तीन प्रश्नांची उत्तरे बारकाईने शोधली जातात .

9. त्यामुळे मुलाखत देताना या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्या पद्धतीने मुलाखतीची तयारी करा .

10. तुमचे सिलेक्शन होवो अथवा न होवो, मुलाखत झाल्यावर एक थॅंकिंग नोट पाठवायला विसरु नका ही एक थॅंकिंग नोट तुमच्या पुढच्या जॉबची किल्ली ठरू शकते.

source : https://majhinaukri.in/interview-tips/

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.