जगातील सर्वप्रथम अशा कोविड-१९ कृती संघाची भारतात सुरूवात

Date : Apr 03, 2020 12:20 PM | Category : राष्ट्रीय
जगातील सर्वप्रथम अशा कोविड-१९ कृती संघाची भारतात सुरूवात
जगातील सर्वप्रथम अशा कोविड-१९ कृती संघाची भारतात सुरूवात Img Src (New Scientist)

जगातील सर्वप्रथम अशा कोविड-१९ कृती संघाची भारतात सुरूवात

  • कोविड-१९ कृती संघ जो जागतिक स्तरावर सर्वप्रथम अशा स्वरूपाचा आहे त्याची भारतात सुरूवात झाली आहे

सुरुवात

  • कोविड-१९ कृती संघ खासगी क्षेत्राच्या प्रमुख फंड व्यवस्थापक आणि ब्लू-चिप व्हेंचर कॅपिटल फर्ममार्फत सुरू झाला आहे

महत्व

  • संघाकडून स्थापन केलेल्या निधीतून मायलॅबने १ कोटी रुपये मिळविल्यामुळे संघाची लोकप्रियता वाढीस लागली आहे

वेचक मुद्दे

  • मायलॅब ही कोरोना तपासणी किट बनवून विकण्याची परवानगी मिळवणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे

  • भारत सरकार सध्या स्वदेशात बनवलेल्या किटचा वापर आणि प्रचार करीत आहे

ठळक बाबी

  • G-२० शिखर परिषदेत भारताकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund - IMF) किट्सचा वापर करण्याच्या सूचनेस नकार देण्यात आला आहे

  • विषाणूच्या चाचणीसाठी स्वदेशात बनवलेल्या किटचा वापर करावा अशी भारताची भूमिका आहे

उद्देश

  • भारतीय नवउद्योजक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोविड-१९ आधारित उत्पादने आणि संशोधन कार्यांवर काम करण्यासाठी संघाकडून हा निधी उभारला जात आहे

लक्ष

  • १०० कोटींची सोय करणे हे या संघाने उद्दिष्ट ठेवले आहे

महत्वपूर्ण बाबी

  • सदर पुढाकार हा जगातील सर्वप्रथम प्रकारचा आहे

  • कार्यसंघ निधी संकलन करून कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी उत्पादने आणि सेवांवर काम करणार्‍या उपक्रमांची ओळख पटवून देईल

  • संघाने आतापर्यंत ४०% अनुदान जमा करण्यात यश मिळवले आहे

  • केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्र्यांनी देशातील स्टार्टअपशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान नुकतेच या संघाचे कौतुक केले आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.