'समुद्र चाचेगिरी विरोधी विधेयक' लोकसभेत सादर

Date : Dec 11, 2019 04:55 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'समुद्र चाचेगिरी विरोधी विधेयक' लोकसभेत सादर
'समुद्र चाचेगिरी विरोधी विधेयक' लोकसभेत सादर

'समुद्र चाचेगिरी विरोधी विधेयक' लोकसभेत सादर

  • १० डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत 'समुद्र चाचेगिरी विरोधी विधेयक' सादर

विधेयक सादरीकरण

  • श्री. सुब्रह्मण्यम जयशंकर (परराष्ट्रमंत्री)

  • नायजेरियात झालेल्या १८ भारतीयांच्या अपहरणानंतर काही दिवसांत विधेयक मांडणी

उद्दीष्ट

  • भारतीय सागरी व्यापार आणि चालक दल सदस्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे

वेचक मुद्दे

  • समुद्र कायद्यावरील संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार (United Nations Convention on the Law of the Sea - UNCLOS) विधेयक तयार

  • समुद्रावरील चाचेगिरीमध्ये गुंतलेल्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद

  • विधेयकाच्या कलमात नमूद: चाचेगिरी कृत्यात सामील असलेल्यांना कारावास आणि मृत्यूदंडाची शिक्षा

आवश्यकता

  • हिंदी महासागर प्रदेशात २००८ पासून चाचेगिरीत वाढ

  • एडनच्या आखाती प्रदेशात दिवसाला २,००० हून अधिक जहाजांचा वापर

  • सोमालियाकडून आखातावर अनेक हल्ले

भाग महत्व

  • युरोप, आशिया आणि आफ्रिकेचा पूर्व किनारपट्टी दरम्यानचा सर्वात व्यस्त व्यापार मार्ग

घटना आणि भारत

  • भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही परिणाम

  • बर्‍याच देशांकडून त्यांच्या जहाज रक्षणासाठी एडनच्या आखाती प्रदेशातील सुरक्षेत वाढ

  • चाच्यांना त्यांच्या ऑपरेशन करिता पूर्वेकडे व दक्षिणेकडे जाणे भाग

  • भारतावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात

  • कठोर कायदे करणे आवश्यक

UNCLOS (United Nations Convention on the Law of the Sea) बद्दल थोडक्यात

  • १९७३ ते १९८२ दरम्यान झालेल्या तिसर्‍या UN संमेलनात UNCOS किंवा समुद्राचे कायदे तयार

  • २०१६ पर्यंत, युरोपियन युनियनसह १७७ देश UNCLOS मध्ये सामील

  • महत्वपूर्ण भूमिका संस्था

    • आंतरराष्ट्रीय मेरीटाईम ऑर्गनायझेशन (International Maritime Organization)

    • आंतरराष्ट्रीय सीबेड ऑथॉरिटी (International Seabed Authority)

    • आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशन (International Whaling Commission)

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.