१ जानेवारी दिनविशेष
1 January Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
१ जानेवारी महत्वाच्या घटना
〉
१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
〉
१८०८: अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
〉
१८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
〉
१८४२: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
〉
१८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
〉
१८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
〉
१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
〉
१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.
〉
१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
〉
१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
〉
१९०८: संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.
〉
१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
〉
१९२३: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
〉
१९३२: डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.
〉
१९९५: WTO ची स्थापना झाली.
〉
१९९५: WTO ची स्थापना झाली.
१ जानेवारी जन्म
〉
१६६२: पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
〉
१८७९: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९७०)
〉
१८९२: स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
〉
१८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
〉
१९००: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
〉
१९०२: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
〉
१९१८: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
〉
१९२३: अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टुन टुन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
〉
१९२८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९८)
〉
१९३६: साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९७)
〉
१९४१: चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.
〉
१९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.
〉
१९५०: भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.
〉
१९५१: अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.
१ जानेवारी मृत्यू
〉
१५१५: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १४६२)
〉
१७४८: स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन.
〉
१८९४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिच हर्ट्झ यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
〉
१९४४: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १८६९)
〉
१९५५: भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.
〉
१९७५: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१)
〉
१९८९: समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.
〉
२००९: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
जानेवारी महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
दिनांक :
४ जानेवारी १८८१

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)
दिनांक :
६ जानेवारी १८१२

महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
दिनांक :
९ जानेवारी २००२

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)
दिनांक :
११ जानेवारी १९६६

राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)
दिनांक :
१२ जानेवारी १५९८

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
दिनांक :
१८ जानेवारी १८४२

आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
दिनांक :
२० जानेवारी १९५७

मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
दिनांक :
२१ जानेवारी १९७२

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
दिनांक :
२३ जानेवारी १८९७

भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
दिनांक :
२६ जानेवारी १९५०

स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)
दिनांक :
२८ जानेवारी १८६५

महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)
दिनांक :
३० जानेवारी १९४८

WTO ची स्थापना झाली.
दिनांक :
१ जानेवारी १९९५

नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण
दिनांक :
१७ जानेवारी १९४१

भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली
दिनांक :
२४ जानेवारी १९५०

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
दिनांक :
३१ जानेवारी १९९२