10 August Dinvishesh

10 August Dinvishesh (१० ऑगस्ट दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 10 August 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१० ऑगस्ट महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६७५: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
१८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.
१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.
१९८८: दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.
१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
१९९९: इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.

१० ऑगस्ट जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७५५: ५ वा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३)
१८१०: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८६१)
१८१४: नेस्ले कंपनी चे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १८९०)
१८५५: जयपूर – अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४६)
१८६०: संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)
१८७४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९६४)
१८८९: मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरो यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९६८)
१८९४: भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)
१९०२: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८३)
१९१३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २००३)
१९३३: कोसवर्थ कंपनी चे संस्थापक किथ डकवर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००५)
१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट पारू शफकत राणा यांचा जन्म.
१९५६: भारताती-इंग्रजी उद्योगपती पेरीन वॉर्सी यांचा जन्म.
१९६०: भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २००१)
१९६३: भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २००१)

१० ऑगस्ट मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९५०: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०७)
१९८०: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)
१९८२: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९२७)
१९८६: महावीरचक्र प्राप्त जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. (जन्म: २७ जानेवारी १९२६)
१९९२: कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. (जन्म: १२ ऑगस्ट१९०६)
१९९७: कवी व नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन.
१९९९: भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
२०१२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३२)

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९४७

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट १९०५

NMK

दिनांक : १ ऑगस्ट १९२०

NMK

दिनांक : ६ ऑगस्ट १९५२

NMK

दिनांक : ८ ऑगस्ट १९६७

NMK

दिनांक : ९ ऑगस्ट १९४२

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९६९

NMK

दिनांक : १६ ऑगस्ट १९३२

NMK

दिनांक : २७ ऑगस्ट १९७२

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट २०१३

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.