13 August Dinvishesh

13 August Dinvishesh (१३ ऑगस्ट दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 13 August 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१३ ऑगस्ट महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
१८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
१९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
१९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
१९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.
१९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.

१३ ऑगस्ट जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८८८: स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९४६)
१८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९१८)
१८९८: लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६९)
१८९९: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)
१९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९८)
१९२६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१६)
१९३६: चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला यांचा जन्म.
१९४५: भारतीय-इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा जन्म.
१९८३: भारताचा ९ वा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म.

१३ ऑगस्ट मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन. (जन्म: ३१ मे १७२५)
१८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १७८१)
१९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. (जन्म: १२ मे १८२०)
१९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८६०)
१९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१)
१९४६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८६६)
१९७१: बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले यांचे निधन.
१९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१०)
१९८५: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९००)
१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन.
२०००: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९६५)
२०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२८)
२०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९२१)

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९४७

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट १९०५

NMK

दिनांक : १ ऑगस्ट १९२०

NMK

दिनांक : ६ ऑगस्ट १९५२

NMK

दिनांक : ८ ऑगस्ट १९६७

NMK

दिनांक : ९ ऑगस्ट १९४२

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९६९

NMK

दिनांक : १६ ऑगस्ट १९३२

NMK

दिनांक : २७ ऑगस्ट १९७२

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट २०१३

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.