2 January Dinvishesh

2 January Dinvishesh (२ जानेवारी दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 2 January 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२ जानेवारी महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
१८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.
१९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
१९४५: दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले
१९५१: रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.
१९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.
१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.
१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.
१९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये१४ इंच टर शिकोगामध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -‌‍१३°F इतके कमी झाले.
२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

२ जानेवारी जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९२०: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९९२)
१९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)
१९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.
१९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)

२ जानेवारी मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१३१६: दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचे निधन.
१९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)
१९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.
१९४४: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८७३)
१९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.
१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९५४)
१९९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.
२००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.
२०१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.

जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ४ जानेवारी  १८८१

NMK

दिनांक : ६ जानेवारी  १८१२

NMK

दिनांक : ९ जानेवारी  २००२

NMK

दिनांक : ११ जानेवारी  १९६६

NMK

दिनांक : १२ जानेवारी  १५९८

NMK

दिनांक : १८ जानेवारी  १८४२

NMK

दिनांक : २० जानेवारी  १९५७

NMK

दिनांक : २१ जानेवारी  १९७२

NMK

दिनांक : २३ जानेवारी  १८९७

NMK

दिनांक : २६ जानेवारी  १९५०

NMK

दिनांक : २८ जानेवारी  १८६५

NMK

दिनांक : ३० जानेवारी  १९४८

NMK

दिनांक : १ जानेवारी  १९९५

NMK

दिनांक : १७ जानेवारी  १९४१

NMK

दिनांक : २४ जानेवारी  १९५०

NMK

दिनांक : ३१ जानेवारी  १९९२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.