24 July Dinvishesh

24 July Dinvishesh (२४ जुलै दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 24 July 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२४ जुलै महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१५६७: स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.
१७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
१८२३: चिलीमध्येे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
१९११: हायराम बिंगहॅम – ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.
१९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.
१९६९: चंद्र मोहिमेनंतर अपोलो ११हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.
१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
१९९०: इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.
१९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
१९९७: बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
१९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
२०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.
२००१: टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शिखा टंडनने फ्रीस्टाइल प्रकारात १०० मी. अंतर ५९.९६ सेकंदांत पार केले.
२००५: लान्स आर्मस्ट्राँगने टूर-डी-फ्रान्स ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.

२४ जुलै जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म.
१८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.
१९११: हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म.
१९११: बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९६०)
१९२८: गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य केशुभाई पटेल यांचा जन्म.
१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म.
१९४५: विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा जन्म.
१९४७: पाकिस्तानी फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्म.
१९६९: अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेझ यांचा जन्म.

२४ जुलै मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
११२९: जपानी सम्राट शिराकावा यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १०५३)
१९७०: भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९७)
१९७४: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९१)
१९८०: बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९२७)
१९८०: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)
२०१२: सीटी स्कॅन चे शोधक रॉबर्ट लिडले यांचे निधन. (जन्म: २८ जुन १९२६)

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १८ जुलै १८५७

NMK

दिनांक : २६ जुलै १९९९

NMK

दिनांक : २३ जुलै १८५६

NMK

दिनांक : ३१ जुलै १८६५

NMK

दिनांक : १ जुलै १९१३

NMK

दिनांक : ५ जुलै २००४

NMK

दिनांक : ५ जुलै २०१७

NMK

दिनांक : ७ जुलै १८५४

NMK

दिनांक : १० जुलै १८००

NMK

दिनांक : ११ जुलै १९८९

NMK

दिनांक : १५ जुलै २०१४

NMK

दिनांक : १८ जुलै १९६९

NMK

दिनांक : २० जुलै १९२४

NMK

दिनांक : २२ जुलै १९४७

NMK

दिनांक : १९ जुलै १९६९

NMK

दिनांक : २६ जुलै १९०२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.