25 November Dinvishesh

25 November Dinvishesh (२५ नोव्हेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 25 November 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२५ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
१९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
१९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
१९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
१९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
१९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
२०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

२५ नोव्हेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.
१८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)
१८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)
१८८९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
१८८२: मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९६८)
१८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.
१९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
१९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)
१९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
१९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.
१९३९: मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान यांचा जन्म.
१९५२: पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.
१९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.
१९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.

२५ नोव्हेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८८५: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)
१९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
१९६०: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
१९६२: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८६८ – अकोळनेर, अहमदनगर)
१९७४: संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९०९)
१९८४: भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९१३)
१९९७: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.
१९९७: मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन. (जन्म: १४ मे १८९८)
१९९८: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
२०१३: बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)
२०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९२०)
२०१६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १४ नोव्हेंबर १८८९

NMK

दिनांक : १५ नोव्हेंबर २०००

NMK

दिनांक : १६ नोव्हेंबर १९४५

NMK

दिनांक : १८ नोव्हेंबर १९६२

NMK

दिनांक : ९ नोव्हेंबर २०००

NMK

दिनांक : ५ नोव्हेंबर १८७०

NMK

दिनांक : १ नोव्हेंबर १९५६

NMK

दिनांक : ७ नोव्हेंबर १८२४

NMK

दिनांक : ९ नोव्हेंबर २०००

NMK

दिनांक : १९ नोव्हेंबर २०१३

NMK

दिनांक : १९ नोव्हेंबर १९१७

NMK

दिनांक : २२ नोव्हेंबर १९६५

NMK

दिनांक : २६ नोव्हेंबर १९४९

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.