ASO 2016 - Main Paper 2

ASO 2016 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे/आहेत ? 

अ. राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल दूर करता येते. 

ब. महाभियोगासंबंधीच्या आरोपपत्राची सुरुवात फक्त कनिष्ठ सभागृहात केली जावू शकते.

क. आरोपपत्रावर सभागृहाच्या एक-तृतीयांश सदस्यांच्या स्वाक्षच्या आवश्यक असतात. 

ड. महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीस एक महिन्याची पूर्वसूचना (नोटीस) द्यावी लागते. 

ई. नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेत सहभागी होवू शकत नाही.

62.

राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. 

अ. फक्त युद्ध अथवा परकीय आक्रमण प्रसंगी. 

ब. फक्त सशस्त्र बंड प्रसंगी.

क. फक्त अंतर्गत अशांतता प्रसंगी.

ड. फक्त पंतप्रधानांच्या लेखी सल्यानुसार.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

63.

लोकसभेच्या सभापती बाबत खालील विधाने विचारात घ्या : 

अ. सभागृहात हजर राहून मतदान करणाच्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून त्यांना पदावरून दूर करता येते. 

ब. त्यांच्यावरील पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव जेंव्हा विचाराधीन असेल तेव्हा सभापती सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असू शकत नाहीत, परंतु त्यांना भाषण करण्याचा आणि कार्यप्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार असतो. 

क. पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावावर समान मतविभागणी झाल्यास त्यांना निर्णायक मत वापरण्याचा
अधिकार असतो. 

64.

खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हींच्या अधिकारक्षेत्राखाली येते ?

65.

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक बाबत खालील विधाने लक्षात घ्या : 

अ. तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो. 

ब. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर पंतप्रधानकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते. 

क. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर राष्ट्रपतीकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते. 

ड. लोकसभेतील साध्या बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर वित्त मंत्र्यांकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते.

खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :

66.

‘राज्यपाल ' संदर्भात खालील जोड्या योग्यपणे जुळवा : 


67.

खालील दिलेली भारतीय संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान व राष्ट्रपति मधील संबंध विस्तृतपणे अधिराज्यीत करतात ?

अ. कलम - 75

ब कलम - 73 

क. कलम - 74

ड. कलम - 78 

खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :

68.

लोकलेखा समिती बाबत खालील विधाने विचारात घ्या : 

अ. तिची निर्मिती ही भारत सरकार कायदा (माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा) 1919 मधील तरतूदीनुसार झाली आहे. 

ब. 1954 पुर्वी ही समिती केवळ लोकसभेद्वारा निवडलेल्या 15 सदस्यांचीच होती.

क. सध्या या समितीमध्ये 22 सदस्य आहेत (लोकसभेतून - 15 आणि राज्यसभेतून - 7). 

ड. ही विस्तारीत समिती लोकसभेची समिती म्हणून सभापतीच्या नियंत्रणाखाली कार्य करते.

69.

खालील विधाने लक्षात घ्या : 

अ. दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक-चतुर्थांश सदस्य निवृत्त होतात. 

ब. दर तीन वर्षांनी राज्यसभेचे एक-तृतियांश सदस्य निवृत्त होतात. 

क. दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक-तृतियांश सदस्य निवृत्त होतात. 

ड. राज्यसभा हे कायम स्वरूपी सभागृह आहे. 

वर दिलेले विधानांपैकी कोणते योग्य आहेत ? 

70.

भारताचे संविधानातील दुरूस्ती बाबतचा पुढाकार ___________ क डून घेतला जाऊ शकतो. 

अ. लोकसभा  राज्य विधिमंडळ

ब. राज्यसभा

क.राज्य विधिमंडळफक्त अ 

ड. भारताचे राष्ट्रपती 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?

71.

खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा : 

72.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 

अ. 6 फेब्रुवारी, 1956 रोजी पुणे येथे भरलेल्या विरोधी पक्षांच्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी एस्.एम्. जोशी होते. 

ब. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 डिसेंबर, 1956 रोजी झाली. 

क. 1957 च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड यश प्राप्त केले होते.

73.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. सत्रावसानाचा (prorogation) अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. 

ब. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकांच्या स्थगितीचा (adjourn) अधिकार देखील राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. 

क. इंग्लंडमध्ये सत्रावसानाचे, सत्रावसानाच्या तारखेला प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते. 

ड. भारतात सत्रावसानाचा परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित राहतात. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

74.

विधानसभा सदस्य ही सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही, जर तो सदस्य

75.

खालील विधाने विचाराय घ्या :  

अ. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूका राष्ट्रपती करतात. 

ब. भारतात राज्य पातळीवर 29 उच्च न्यायालये आहेत. 

क. कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. 

वरीलपैकी कोणते/ती,विधानाने बरोबर आहेत ?

76.

संचालनालय प्रमुखाची _________ कार्ये आहेत.

अ. सहाय्यकारी संघटनेचा (staff agency) एक सहाय्यकारी घटक म्हणून कार्य करणे 

ब. मंत्र्यास तांत्रिक बाबतीत सल्ला देणे 

क. विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे 

ड. विभागाच्या कार्याची अंमलबजावणी चे निरीक्षण करणे 

ई. प्रवेशपूर्व प्रशिक्षणाच्या (pre-entry training) कार्यक्रमांचे आयोजन करणे

77.

महाराष्ट्र विधान परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या : सध्या : 

अ. 26 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात. 

ब. 26 सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात. 

क. 30 सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात. 

ड. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात.

78.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. जम्मू आणि काश्मिर राज्याला 370 व्या कलमान्वये विशेष दर्जा देण्यात आला आहे. 

ब. जम्मू आणि काश्मिर राज्याची राज्यघटना 26 जानेवारी, 1957 पासून अंमलात आली. 

क. जम्मू आणि काश्मिर राज्याच्या राज्यघटनेत 258 कलमे आहेत. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

79.

भारताच्या महाअधिवक्ता च्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या : 

अ. तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो. 

ब. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असावी लागते, ती पात्रता त्याच्या ठिकाणी असावी.

क. राष्ट्रपतीशी सल्लामसलत केल्यानंतर पंतप्रधानाकडून तो नियुक्त केला जातो. ड. तो राज्यसभेचा पदसिद्ध सदस्य असतो.

वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते योग्य आहे/आहेत ?

80.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. न्या. फजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते.

ब. 1987 मध्ये मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा ही राज्ये भारतीय संघराज्यातील अनुक्रमे 23, 24 व 25 वे राज्य म्हणून अस्तित्वात आली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2016 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.