महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या :
              सांप्रत काळी हिंदु लोक गरीब आहेत व अज्ञानी आहेत, एतद्विषयी मी सिद्धान्त लिहितों कीं, संपदा आणि ज्ञान ही दोन्ही, जोपर्यंत यांस आपली स्थिती कळली नाही तोपर्यंत प्राप्त होणार नाहींत. जरी हा देश उत्तम प्रकारचे उत्पन्न करणारा, व धनधान्यसमृद्धिकर्ता आहे, तरी या लोकांस त्याचे फळ नाहीं.
             आतां पृथ्वीवर दुसरे अनेक देश आहेत. त्यांची अवस्थाही फार वाईट आहे. रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे दरिद्री आहेत; परंतु हे उदाहरण या देशास उपयोगी नाही. कारण की, हा देश पूर्वी कसा होता व हल्लीं कसा
आहे, ते पाहून विचार केला पाहिजे. किती एक लोक असे आहेत की, मुसलमानांचे राज्यास नांव ठेवीत नाहीत; परंतु इंग्रजांचे राज्य विशेषेकरून दरिद्रास कारण समजतात व त्यांस कांही नवीन शहाणपणाची युक्ति सांगितली, तर ऐकत नाहींत आणि म्हणतात की, आम्हांस आजपर्यंत या युक्ति कोठे होत्या ? आजपर्यंत आम्ही दुःखी नव्हतो; आता मात्र झालों, ते इंग्रजांमुळे झालो. यास्तव या युक्तीने आमचे दारिद्र्य जाणार नाहीं, इंग्रज जातील तर मात्र जाईल. असे समजून युक्तीस बहुत लोक अगदीं मानीत नाहीत. फक्त हे राज्य वाईट, असे म्हणून संध्याकाळपासून उजाडेपर्यंत, आणि उजाडल्यापासून सारा दिवसभर जप करितात.
                    या प्रकारचे लोक आम्ही नित्य पहातो. तेव्हा अशा लोकांची समजूत पाडणे हे सर्वांहून अवघड आहे; परंतु पहा कीं, असा विचार करीत बसणे मूर्खपणाचे आहे. उद्योगास झटणे हा शहाणपणा आहे. दारिद्र्य आहे खरें, व ते पदोपदी वृद्धिंगत होत चालले आहे. द्रव्यांचे साधन कमी होत चालले आहे; परंतु अशा जपाने उपाय होणार नाही. जर विद्या व ज्ञान येणेकरून आपले दारिद्रय कमी केले, तरच होईल. ज्ञान जेथे आहे, तेथे सर्व पराक्रम
आहे; परंतु हिंदु लोकांमध्ये एकमत असेल, तर या गोष्टी घडतील. आपल्यापासून आपली कंठाळ एखादा घेऊन गेला, तर जागेवर बसून शिव्या दिल्या तर कंठाळ येईल की काय ? यास्तव जे नेणारे आहेत, ते परत देण्यास अनुकूल करण्याचे जे प्रयत्न असतील, ते करावे. ते तरी शहाणपणाखेरीज कसे सांपडतील, यास्तव शहाणपण मुख्य पाहिजे. त्याचे योगाने दारिद्रय कमी होईल.
                    या देशांतील लोकांनी विलायतेस जावे, तेथे वस्ती करावी. विद्या शिकावी. जे श्रीमंत आहेत, त्यांनी या कामांत द्रव्य खर्चावे, तिकडील ज्ञानाची वृद्धि करावी. तिकडील कलाकौशल्ये इकडे आणावे; आपल्या दुष्ट चाली सोडाव्या, हेच शहाणपण आहे. या शहाणपणाने लोकांस समर्थता येईल. आणि समर्थतेनंतर दारिद्र्य जाईल. मुख्य ज्ञानापासून सर्व पराक्रम आहेत. कधी कधी ज्ञानाबरोबर लागलेच पराक्रम दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. कारण की, किती एक मूर्ख असून, अधिकार पावतात, तेव्हा त्यांस अधिकार कसा मिळाला ? हा प्रश्न बहुतेक हिंदु लोक करितात; परंतु हा केवळ पोरकट प्रश्न आहे. पराक्रमाची रीति अशी आहे की, जो कोणी घरांत प्रमुख शहाणा असतो, तो बहुत द्रव्य संपादन करतो. नंतर त्याचे विभाग पश्चात् किंवा केंव्हा तरी होतात. तेव्हा त्यांतील एक विभाग अयोग्य पुरुषाच्या हाती लागतो, म्हणून कोणी जर असे म्हटले की, हे सर्व मूर्खपणाने संपादन केले आहे, तर ही गोष्ट सत्य नाहीं.
 

1.

लेखकाच्या मते हिंदू लोक गरीब आणि अज्ञानी असण्याची कारणे काय आहेत ?

2.

वरील उता-यास योग्य शीर्षक द्या.

3.

श्रीमंत लोकांकडून लेखकाची काय अपेक्षा आहे ? 

4.

लेखकाच्या मते दारिद्र्य कमी होण्याचा मार्ग कोणता ?

5.

या उताच्याची मध्यवर्ती संकल्पना काय आहे ?

6.

शब्दाला जोडून आलेल्या अव्ययांना काय म्हणतात ?

7.

संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत ?

8.

खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

9.

'पार्वती' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? 

10.

न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. 

a. कर्मकर्तरी प्रयोग 

b. कर्मभाव संकर प्रयोग 

c. कर्मणी प्रयोग

d. भावे प्रयोग 

11.

Match the following sentences with correct prepositions to fill in the blanks : 

12.

Match the following: 

13.

I met unexpectedly an old friend yesterday at the bus station.

Select the correct alternative that could replace the underlined part meaningfully

14.

__________ parents sat up half the night. 

Which one of the following correctly fills the blank in the above sentence ? 

15.

a. The accident was put down to bad luck.

b. I really love being given presents.

c. Tom was liked to be there.

d. She is being treated in hospital. Identify the correct passive sente

nce/s. 

Read the following passage carefully and answer the questions from 16 to 20 :
              A person who takes the trouble to form his own opinions and beliefs, will feel that he owes no responsibility to the majority for his conclusions. If he is a genuine lover of truth, if he is inspired by a passion for seeing things as they are and an adherrence of holding ideas which do not conform to facts, he will be wholly independent of the assent of those around him. When he proceeds to apply his beliefs in the practical conduct of life, the position is different. There are then good reasons why his attitude should be less inflexible. The society in which he is placed is an ancient and composite growth. The people from whom he dissents have not come by their opinions, customs and by a process of mere haphazard. These opinions and customs, all had their origin in a certain real supposed fitness. They have certain depth of root in the lives of a proportion of the existing generation. Their congruity with one another may have come to an end. That is only one side of the truth. The most zealous propagandism cannot penetrate to them. In common language, we speak of a generation as something possessed of a kind of exact unity, with all its parts and members honiogeneous. Yet, plainly it is not this. It is a whole but a whole in a state of constant flux; its factors and elements are eternally shifting. It is not one but many generations. Each of the seven ages of man is neighbour to all the rest. The column of the veterans is already sinking into the last abyss, while the column of the newest recruits is forming its tradition, its tendency and its possibilities. Only a proportion of each can have nerve enough to grasp the banner of a new truth and endurance to bear it along rugged and untrodden ways. Thus we must remember the stuff of which life is made. We must consider what an overwhelming preponderance of the most tenacious energies and most concentrated interests of a society must be absorbed between material cares and the solitude of the affections. It is obviously unreasonable to lose patience and quarrel with one's time because it is tardy in throwing off its institutions and beliefs and slow to achieve the transformation which is the problem in front of it. Men and women have to live. The task for most of us is arduous enough to make us well pleased with even such imperfect shelter as we find in daily use and wont. To insist on whole community being made at once to submit to the reign of new practices and ideas that have just begun to commend themselves to the most advanced speculative intelligence of the time, this even if it were a possible process, would do hurry on social dissolution.

16.

Select the correct antonym from the passage to 

miscellaneous

17.

'rugged and untrodden ways’ in the passage means

18.

What is the hard task the author refers to in the above passage ?

a. To discard old beliefs for transformation. 

b. To accept new practices and ideas.

c. To be absorbed between material cares and solitude of affection. 

Select the correct answer.

19.

An overnight change in social setting is not desirable because 

a. The society in which the person lives is an ancient and of composite growth. 

b. The opinions and customs in the society are deep rooted. 

Select the correct alternative to complete the sentence

20.

According to the passage, customs and traditions originate from 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.