महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

घेईघेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. अधोरेखित शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता ?

2.

खालीलपैकी कोणते उदाहरण हे स्वरसंधीचे आहे ?

अ. विद्या + अर्थी = विद्यार्थी

 ब. सत् + जन = सज्जन

क. तपः + धन = तपोधन 

इ. चित् + आनंद = चिदानंद 

3.

पुढीलपैकी सुयोग्य शब्द समूह कोणता ?

अ. देशी - हाड, डोळा, घोडा, झाड

ब. गुजराती - दादर, रिकामटेकडा, दलाल, डबा

क. कानडी - भाकरी, तूप, विळी, चाकरी

ड. फारशी - सामना, पेरावा, हकिकत, अमर

4.

पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द समूह कोणता ?

अ. गुटगुटीत, किरकिर, डावपेच, वटवट 

ब. अर्धामुर्धा, झाडबीड, किडूकमिडूक, अघळपघळ

क. उदयाबिदया, फडफड, तुरुतुरु, देवघर

ड. वरीलपैकी सर्व .

5.

मराठीतील ट , ठ , ढ, ही व्यंजने कोणती वर्ण म्हणून ओळखली जातातं ? 

अ. कंठ्य

ब. दत्य

क. मूर्धन्य

ड. कंठतालव्य

6.

ख, झ, फ्, स् या व्यंजनांना ... असे म्हणतात.

7.

खालील विधानाचा वाक्य प्रकार सांगा.   

'तानाजी लढता लढता मेला.'

8.

जगा पण माणसासारखे !' या वाक्यातील प्रकार ओळखा.

अ. समुच्चय बोधक

ब.  क्किल्प बोधक

क. न्युनत्व बोधक

ड. परिणाम बोधक

9.

खालीलपैकी बहुव्रीहि समास नसलेला शब्द ओळखा.

अ. लंबोदर

ब. देवालय

क. चंद्रानना

ड. त्रिनयन 

10.

काल रात्री म्हणे गारा पडल्या.' अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

अ. शब्दयोगी अव्यय

ब. उभयान्वयी अव्यय

क. केवल प्रयोगी अव्यय

ड. क्रियाविशेषण अव्यय

11.

त्याची मती कुंठीत झाली.' अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात सोङतो ? . 

अ. तत्सम 

ब. तद्भव 

क. देशी

ड. परभाषिय

12.

मनुष्य मर्त्य आहे या वाक्यातील उद्देश्य आणि विधेय ओळखा.

अ. उद्देश्य - मर्त्य, विधेय - आहे 

ब. उद्देश्य - मनुष्य, विधेय - मर्त्य 

क. उद्देश्य - मनुष्य, विधेय - मर्त्य आहे

ड. उद्देश्य - मर्त्य आहे, विधेय - मनुष्य 

13.

रमेशनी ही गोष्ट मला सांगितली या विधानात ही गोष्ट मलाच सांगितली दुस-या कुणाला नव्हे' या अर्थासाठी कोणत्या शब्दावर बलाघात होतो ?

अ. रमेशनी 

ब. ही

क. गोष्ट 

ड. मला 

14.

सव्यापसव्य करणे या वाक्प्रचाराचा नेम्य अर्थ निवडा. 

अ. भांडण करणे 

ब. यातायात करणे 

क. तडजोड करणे 

ड. सारवासारव करणे 

15.
  • कथाकाराने या कथेची सुरवात छान केली आहे. पण फुले माडी  ती जमली नाही 'अोरेखित वाक्य समुहासांठी योग्य वाक्प्रचार निवडा. 
  • अ. हात टेकणे 
  • ब. वाट लावणे. 
  • क. वा-यावर सोडणे 
  • ड. भट्टी बिघडणे

16.

घरचं झालं. बोर्ड, व्याह्याने घाळलं घोडं' या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. 

अ. कर्जबाजारी होणे

ब. घरच्या कामातून वेळ न मिळणे 

क. दिखाऊपणा करणे  

ड. अकस्मात श्रीमंत होणे 

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 17 ते 21 प्रश्नांची उत्तरे द्या. 
              चंपारण्यामध्ये गावशाळा व गावसफाई यांखेरीज गोरक्षणाचे काम मी हाती घेतले होते. गोशाळा व हिंदीप्रचार या कामांचा मक्ता मारवाडी बंधूनी घेतलेला आहे, असे माझ्या प्रवासामध्ये माझ्या लक्षात येऊन चुकले होते. बेतियामध्ये एका मारवाडी गृहस्थाने आपल्या धर्मशाळेत मला आश्रय दिला होता, आणि तेथील इतर मारवाडी गृहस्थांनी आपल्या गोपालनाच्या कामामध्ये मला रस उत्पन्न केला होता. गोरक्षणासंबंधी आज माझे जे विचार आहेत, तेच या वेळीही बनून गेले होते. गोरक्षण म्हणजे गोवंशवृद्धी, गोजातिसुधारणा, बैलांकडून नियमशीर काम घेणे, गोशाळेचे नमुनेदार दुग्धालय बनक्णेि वगैरे. या कामी मारवाडी बंधूनी भरपूर मदत देण्याचे वचन मला दिले. पण मी चंपारण्यामध्ये स्थिर राहू न शकल्यामुळे ते काम अर्धवटच राहिले. बेतियामध्ये गोशाळा तर आजही चालू आहे, पण ती आदर्श दुग्धालय बनू शकली नाही. चंपारण्यातील बैलांकडून अद्यापही त्यांच्या शक्तीपलीकडे काम घेण्यात येते. नावाचे हिंदू अजूनही बैलांना निर्दयपणे झोडपतात व धर्माला बट्टा आणतात. हे शल्य माझ्या हृदयामध्ये कायमचे राहून गेले आहे. जेव्हा जेव्हा मी चंपारण्याला जातो, तेव्हा तेव्हा या अगत्याच्या परंतु अर्धवट राहिलेल्या कामाचे स्मरण होऊन उसासा टाकतो आणि ही कामे अर्धवट सोडून गेल्याबद्दल मारवाडी बंधू व बिहारी लोक मला प्रेमपूर्वक दोष देतात, ते मी मुकाट्याने ऐकून घेतो.

17.

गोरक्षण म्हणजे काय ?

18.

उसासा टाकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ दिलेल्या उताच्यावरुन सांगा. 

19.

प्रस्तुत उताच्यातील आशयाची मध्यवर्ती कल्पना कोणती आहे ?

20.

हिंदू धर्माला बट्टा कशामुळे लागतो ते खालील विधानांच्या आधारे सांगा.

अ. गोशाळेचे जतन न केल्याने

ब. धर्मपालन न केल्याने . 

क. बैलांकडून त्यांच्या शक्तीपलीकडे काम करुन घेणे

ड. बैलांना निर्दयपणे झोडपणे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.