राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालीलपैकी एक ब्रिटीश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की, 1857 चा उठाव सैनिकी विद्रोह नसून 'राष्ट्रीय उठाव' होता :

2.

ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगारवर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये'' - हा ठराव 1940 साली कोणी केला?

3.

गांधार कलाशैली _______ कलाशैलीने प्रभावित झालेली होती.

4.

रोगांच्या उपचारासाठी उपयोगी प्रजातींची यादी :

(a) विलो वनस्पती

(b) यू वृक्ष

(c) डॉग फिश

(d) वाईन (अॅनसिस्ट्रोक्लॅडस कोरुपेनीस)

(e) बेडूक (इपिडोबेटीस ट्रायकलर)

वरीलपैकी कोणती/कोणत्या प्रजाती कर्करोगावर उपचारासाठी वापरण्यात येणारे 'टॅक्सॉल' हे रसायन काढण्यासाठी वापरली जाते/वापरल्या जातात ?

5.

मध्य युगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढील दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात.

(a) अद्वैत, वेदांत अशा तत्त्वज्ञानांचा विस्तार

(b) बौद्ध तत्त्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती

(c) चिदंबरम्, मदुराई अशा मंदिरकेंद्री नगरांचा विकास

(d) रोमन साम्राज्याबरोबर व्यापार

6.

सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते?

7.

खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता?

8.

नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या लावा.

9.

मध्य आशियातून आलेल्या आक्रमणांपुढे उत्तर भारतीय राजसत्ता पराभूत झाल्या कारण :

(a) भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती.

(b) जातिभेदामुळे भारतीय सैनिकात एकोपा नव्हता.

(c) मध्य अशियाई सैन्याची शस्त्रास्त्रे अधिक आधुनिक होती.

(d) आक्रमक सैन्याचे नेतृत्व गुलाम लोक करीत होते.

10.

जवाहरलाल नेहरूंबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) ते स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख होते.

(b) त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.

(c) नेहरू रिपोर्ट लिहून त्यांनी भारतासाठी आदर्श राजपद्धतीचा आराखडा मांडला."मला पाश्चात्य जगात उपच्यासारखे वाटते, पण मायदेशातही कधी कधी परक्यासारखे वाटते', असे त्यांचे मत होते. 

11.

 गांधी-आयर्विन करारामुळे काय साध्य झाले?

12.

कालानुक्रमे रचना करा.

(a) मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिनांच्या चौदा कलमी कार्यक्रमास पसंती दिली. (b) काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली.

(c) लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.

(d) गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

13.

इ.स. 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले कारण :

14.

 खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार (वास्तुविशारद) म्हणतात.

(a) या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार (वास्तुविशारद) म्हणतात.

(b) आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट (Uncrowned Emperor of Mumbai) म्हंटले.

(c) ते मराठी, इंग्रजी व संस्कृत मध्ये उत्कृष्ट होते.

(d) त्यांचे एलफिन्स्टन कॉलेज वर बरेच उपकार/ऋण आहेत. 

15.

‘खोती पद्धत' कोठे होती ?

16.

गन पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटविल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो. या मिश्रणात पुढील बाबी असतात :

(a) पोटॅशियम नायट्रेट

(b) कोळश्याची पावडर

(c) सल्फर
(d) सोडियम कॉर्बोनेट

(e) कॅल्शियम सल्फेट

17.

खालील दोन विधाने पाहावीत :

(a) भारतात प्रती माणशी कृषी क्षेत्राची उपलब्धता सन 1951 च्या 0.48 हेक्टर पासून 1991 पर्यंत 0.16 हेक्टर एवढी कमी झाली व ती 2035 पर्यंत 0.08 हेक्टर पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

(b) कृषी क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचे प्रमुख कारण वाढती लोकसंख्या व कृषी क्षेत्राचे अकृषी क्षेत्राकडे वळतीकरण आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

18.

मुंबई हाय मधे भारताच्या एकूण उत्पादनाच्या 63% खनिज तेल तर 80% नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ओ.एन.जी.सी. ला येथे सर्वप्रथम 1974 मधे तेल लागले. हे खनिज तेल कोणत्या कालावधीचे आहे?

19.

पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा :

(a) अँडिज पर्वत

(b) न्यूझिलंड 

(c) फिलीपाईन्स

(d) तैवान वरीलपैकी

कोणता 'अग्नीकंकणाचा भाग आहे ?

20.

नदी आपल्या संपूर्ण प्रवाहात वेगवेगळे भू-आकार निर्माण करत असते. खालीलपैकी कोणता भू-आकार नदी आपल्या वरच्या टप्प्यात निर्माण करत नाही ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.