राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

राष्ट्रीय महिला आयोगासंबंधी दिलेल्या पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

(a) या आयोगाची स्थापना 1992 साली करण्यात आली.

(b) ही संविधानिक यंत्रणा आहे.

(c) या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असून त्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करतात.

(d) राष्ट्रीय महिला आयोग 'राष्ट्र महिला' नावाची वृत्तपत्रिका प्रसिद्ध करतो.

योग्य पर्याय निवडा. 

2.

'मूलभूत कर्तव्या' बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

(a) म्हंटले तर त्यांना काही महत्व नसते.

(b) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली

(c) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV - अ मध्ये व कलम 51 - अ मध्ये दिली आहेत.

(d) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

3.

खालील मुद्यांचा विचार करा.

(I) सध्या राज्यसभेवर उत्तरप्रदेशातून 31 तर गोव्यातून 2 सदस्य आहेत.

(II) सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर 18 सदस्य पाठवले जातात.

 पर्यायी उत्तरे :

4.

खालील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) आतापावेतो नियमीत राष्ट्रपती म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला.

(b) डॉ. झाकीर हुसेन व श्री. फकरुद्दिन अली अहमद हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणूनचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत. 

5.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य त्यांच्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत किंवा 62 वर्षे वयापर्यंत पदावर कार्यरत राहू शकतात.

(b) जर एखादा सदस्य निवृत्तीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाला तर त्याचे वय कितीही असले तरी त्याला अधिकचा सहा वर्षाचा कार्यकाल मिळतो.

पर्यायी उत्तरे :

6.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कामाबाबत खालील विधानांचा विचार करा.
(a) राज्यसरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही तुरुंगाला किंवा संस्थेला पूर्वसूचना देऊन भेटी देणे. 

(b) इलाज, सुधारणा आणि संरक्षणासाठी डांबून किंवा तात्पुरत्या काळासाठी ठेवलेल्या व्यक्तिच्या परिस्थितीची पाहणी करणे. 

(c) सहवासियांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे.

(d) मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?

7.

यादी क्र.I ची यादी क्र. II शी जुळणी करा.

                           

8.

आंध्रप्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 द्वारे तेलंगण राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना असेल.

9.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे स्वातंत्र्य संविधानाने कशाप्रकारे संरक्षित केले आहे याविषयी पुढे तरतूदी दिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या तरतूदी चुकीच्या आहेत ?

(a) सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना त्यांच्या अवमानासंबंधी शिक्षा देण्याचा अधिकार आहे. 

(b) सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सेवक यांची नेमणूक संबंधित न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश करतात. 

(c) राष्ट्रीय न्यायिक आयोग न्यायाधिशांच्या नेमणुका सुचवितात.

(d) न्यायाधिशांच्या बदलीसाठी स्वयंस्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नमूद आहेत.

पर्यायी उत्तरे :

10.

खालील विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा.
(a) भारतावरील चीनच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पक्षात फूट पडली.

(b) भारत धार्जिण्या कम्युनिस्टांना उजवे तर चीन धार्जिण्या कम्युनिस्टांना डावे असे संबोधले जाऊ लागले.

(c) महाराष्ट्रात उजव्या कम्युनिस्टांचे नेते कॉ. रणदिवे तर डाव्या कम्युनिस्टांचे नेते कॉ. डांगे होते.

(d) कालांतराने डावे कम्युनिस्ट काँग्रेसच्या जवळ गेले, उजवे कम्युनिस्ट मात्र कायम काँग्रेसच्या विरोधात राहिले.

पर्यायी उत्तरे :

11.

जुळणी करा.

12.

विधान (A): काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार घटनेने संसदेला दिला आहे.

कारण (R): राष्ट्रीय आणिबाणीच्या अंमलबजावणीच्या काळात संसद राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते.

पर्यायी उत्तरे

13.

भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

14.

सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा :

(a) समतेचे तत्त्व

(b) स्वातंत्र्याचे तत्त्व

(c) संघराज्य

(d) समाजवादी संरचना

(e) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार

(f) धर्मनिरपेक्षता

पर्यायी उत्तरे : 

15.

राज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदनवन' अशी टीका केली जाते, त्याची कारणे अशी आहेत.खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ? 

16.

सार्वत्रिक निवडणुका 2014 संदर्भातील पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?

(A) हरीयाणा, जम्मू व काश्मिर, उत्तराखंड, पंजाब वे दिल्ली ही ती राज्ये आहेत ज्यांमध्ये भाजपाला 2014 मध्ये काही ना काही जागा मिळाल्यात परंतु सन 2009 मध्ये एकही जागा मिळाली नव्हती.

(B) गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली व हिमाचल प्रदेश ही ती राज्ये आहेत ज्यांमध्ये भाजप 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व च्या सर्व जागा जिंकल्या.

पर्याय :

17.

खाली नमूद केलेल्या भारताच्या राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या स्थापनेसंदर्भात योग्य कालानुक्रम कोणता आहे?

(a) द्र.मु.क.

(b) साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी)

(c) आसाम गण परिषद

(d) तेलुगु देसम पक्ष 

18.

पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा.

19.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) मतदार संघांच्या परिसीमनात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.

(b) कायद्याने सुनिश्चित केलेली प्रक्रिया अंगिकारून एखाद्या व्यक्तीला अटक वा स्थानबद्ध केले असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याबाबत प्रश्न विचारू शकत नाही.

(c) संसदेने पारित केलेला कायदा घटनाबाह्य आहे, असे सर्वोच्च न्यायालय जाहीर करू शकत नाही.

(d) एखादे विधेयक अर्थ विषयक विधेयक आहे अथवा नाही या संदर्भातील अध्यक्षांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय प्रश्न विचारू शकत नाही.

पर्यायी उत्तरे :

20.

भारतीय संविधानाच्या 10 व्या परिशिष्टानुसार एखादा सदस्य अपात्र आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे ते सांगा

(a) राज्यसभेचे अध्यक्ष

(b) लोकसभेचे सभापती

(c) भारताचे राष्ट्रपती

(d) सर्वोच्च न्यायालय

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.