राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

प्रश्न क्रमांक 1 ते 5 :
        "अध्र्या शतकानंतर भारतीय स्वत:साठी कस मराव ते शिकले. यात आम्हाला आयर्लंड आणि रशियातील हुतात्म्यांच्या उदाहरणांमुळे खूपच मदत मिळाली. म्हणून याचे देखील मूळ केवळ भारतातच शोधण चुकीचं होईल, ना?"

        "अलबत्, सैफूभाई, सगळ्या जगाचे धागेदोरे एकमेकात गुंतलेले आहेत.''
       ''शंकर, कोणत्याही क्रांतिकारक चळवळीचे सामर्थ्य दोन गोष्टींवर निर्भर असत. तिला आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि उदाहरणांतून किती प्रेरणा मिलते ही एक, आणि देशातला सर्वाधिक क्रांतिप्रवण असा वर्ग तिच्यात किती प्रमाणात भाग घेतो ही दुसरी. पहिल्या शक्तिप्रवाहाची काही उदाहरण आता दिलीच. दुसरा शक्तिस्रोत म्हणजे कामगार, किसान, जनता. क्रांतीची लढाई तेच लढू शकतील, ज्यांच्याकडे हरण्याजोग काहीच नसत. सकीनाच्या ओठांची लाली, हा बंगला आणि बापाची तालुकदारी गाव गमावण्याची भीती ज्याला वाटते, तो कसला क्रांतीचा सैनिक होणार? म्हणून म्हणतो, क्रांतीच वाहन सामान्य जनताच होऊ शकेल.''
      "मलाही असच वाटत''.
       "छान, आज जनतेत जो उत्साह आहे तो तुला ठाऊक आहे. आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कशी प्रेरणा मिळते बघ. मागच महायुद्ध जगात चांगलीच आग पेटवून गेल ते युद्ध जुंपल याच कारण साम्राज्यवादांच फळ म्हणजेच भांडवल आणि पक्का माल यासाठी सुरक्षित बाजारपेठा ताब्यात ठेवण्याची किंवा हिरावून घेण्याची धडपड. जर्मनीला नव्या वसाहती हव्या होत्या. पण धरित्रीची तर वाटणी होऊन गेली होती. त्यामुळे युद्ध करूनच वसाहती बळकावण भाग होत. झाल वसाहतीचे धनी असणाच्या इंग्लंड आणि फ्रान्सबरोबर जर्मनीची जुंपली, जर्मनी हरला हे बर झाल पण साम्राज्यवादाच्या साखरझोपेत अडथळा आणणारा नवा वैरी जन्माला आला. साम्यवाद ! वस्तूंचे उत्पादन करायचं ते साया मानवांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी; नफा मिळवण्यासाठी नहे, यंत्रामध्ये सुधारणा होतात, कारखाने वाढतात, मालाची पैदास वाढते आणि त्याच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ लागते. पण गि-हाइकाच्या हाती पैसा खेळावा लागतो. त्यासाठी प्रत्येक गि-हाइकाला परेस वेतन मिळाल पाहिजे. पैसा कमी पडला तर मालाची खरेदी घटेल. तो माल गोदामात पडून राहील. मंदी येईल. उत्पादन घटवाव लागेल; तसतसे कारखाने बंद पडतील, तेवढेच कामगार बेकार होतील. आणि खरेदीला पैसा नसेल तर ते काय खरेदी करणार? आणि कारखाने तरी कसले चालणार ? साम्यवाद सांगतो, नफ्याचा लोभ सोडा. आपला देश आणि सगळ जग हे एक कुटुंब मानून गरजेपुरत्याच वस्तू बनवा. प्रत्येकाकडून त्याच्या कार्यक्षतेनुसार काम घ्या, त्याच्या गरजा भागवण्याइतक्या जीवनावश्यक गोष्टी द्या. हे सगळं होईल पण जमिनीवर किंवा कारखान्यावर कुणा एकाची मालकी नसावी. उत्पादनाची सर्व साधन भल्यामोठ्या कुटुंबाच्या मालकीची हवीत.''

1.

पुढील विधानांचा उता-याच्या संदर्भात विचार करा.

साम्यवादात

(a) उत्पादनांची साधने एकत्रित मालकीची असावीत.

(b) नफ्याचा लोभ सोडावा.

(c) व्यक्तींना गरजेपुरत्याच जीवनावश्यक गोष्टी मिळाव्यात.

2.

सैफूभाईंच्या मते साम्यवाद काय सांगतो?

(a) नफ्याचा लोभ सोडावा.

(b) लोकांना भरपूर वेतन द्यावे.

(c) उत्पादनाच्या साधनांवर एकत्रित मालकी असावी.

(d) प्रत्येकाकडून त्याच्या गरजेनुसार काम करून घ्यावे.

3.

पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे/आहेत ?
(a) जर्मनीला भांडवल व पक्का माल हवा होता. 

(b) साम्यवादाअगोदर साम्राज्यवाद निद्रीस्त होता.

4.

सैफूभाईंच्या मते :

(a) भारतीयांना पूर्वी कसे मरावे ते माहित नव्हते.

(b) साम्यवादात पैसा नसेल तर कारखाने बंद पडू शकतील परंतु साम्राज्यवादात त्याकरता कारखाने बंद पडू शकत नाहीत.

कोणते विधान अयोग्य आहे ?

5.

सैफूभाईंच्या मते :
(a) क्रांतीकारी चळवळ यशस्वी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रेरणाच आवश्यक असते.

(b) श्रीमंत क्रांती करू शकत नाहीत. 

प्रश्न क्रमांक 6 ते 10:

            साध्या अर्थाने उत्क्रांती म्हणजे बदलाची संथ प्रक्रिया जी सोप्या पासून गुंतागुंतीच्या प्रारुपाद्वारे होते. उत्क्रांतीमध्ये असे समजले जाते की सर्व सजीव हे एकमेकांशी निगडीत आहेत. मानव हा काही साध्या प्रारूपातून विकसित झाला असे समजले जाते. बहुतेक सर्व शास्त्रज्ञांनी आज उत्क्रांतीचे मुळ तत्व मान्य केले असले तरी उत्क्रांती कशी झाली व पुढे ती कशी असेल याबद्दल विविध मते आहेत. उत्क्रांती सागरात सुरू झाली. जवळजवळ चारशे अब्ज वर्षांपूर्वी पहिला जमिनीवरील जीव निर्माण झाला. यांच्यापैकी काहींची हळूहळू सरपटणा-या प्राण्यांमध्ये उत्क्रांती झाली. त्यानंतर त्यांचे रूपांतर सस्तन प्राण्यांमध्ये झाले. हे। उष्ण रक्ताचे (बदल होणारे) जीव असून त्यांच्यामध्ये अनुभवातून शिकण्याची इतर सजीवांपेक्षा जास्त क्षमता असते. ही क्षमता मानवी प्रजातींमध्ये विकासाच्या उच्च मर्यादित पोहचली आहे. मानवाचे जवळचे नातेवाईक हे चिंपांझी, गोरिल्ला, व ओरँगउटान आहेत. मानव व इतर प्राण्यांमधील साधम्र्य लिनेअस यांनी शोधून काढले व त्यांनी मानव वानरसदृश्य व माकड यांना एका घटकात-ऑर्डर-प्रायमेटस् मधे ठेवले. लॅमार्कवाद, डार्विनवाद व सिंथेटीक सिद्धांत ही उत्क्रांतीची प्रमुख तीन विचारतत्वे आहेत. लॅमार्क हा प्रामुख्याने त्याच्या अनुवंशिकतेने मिळालेल्या गुणधर्माबद्दल ओळखला जातो. ज्याबद्दल दुमत आहे. परंतु त्याला उत्क्रांतीच्या इतिहासात श्रेय दिले जाते ते याकरता की त्याने सर्वप्रथम सांगितले की उत्क्रांती हे सामान्य सत्य असून त्यामध्ये सर्व सजीवांचा समावेश आहे, ती एक सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांताची शास्त्रीय निर्मिती हे प्रामुख्याने चार्ल्स डार्विनचे कार्य आहे तो म्हणतो मानवी उत्क्रांती ही नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून घडते. या सिद्धांताचे मुख्य मुद्दे हे, जगण्यासाठीचा झगडा, विविधता, अति-योग्यच जगतांना जिंकतो आणि नैसर्गिक निवड हे आहेत, डार्विनचा नैसर्गिक निवड हा मुद्दा आधुनिक रचनेमध्ये महत्वाचा घटक ठरतो. परंतु बदलाचा सिद्धांत, दुरुस्तीचा उद्गम आणि गत्यात्मक लोकसंख्येचे संख्याशास्त्र सुद्धा तिच्या स्थापनेचे महत्वाचे घटक आहेत. सिंथेटिक सिद्धांताचे मुख्य गृहीत हे आहे की, उत्क्रांती ही प्रक्रिया पाच स्वतंत्र प्रक्रियामधला सहसंबंध दर्शविते त्या पाच प्रक्रिया म्हणजे बदल, गुणसुत्राच्या क्रमांक व रचनेमधिल बदल, पुनःजुळवणी, नैसर्गिक निवड आणि स्वतंत्र पुनःनिर्माण यालाच नव डार्विनवाद असे म्हणतात.
 

6.

अधिकांश शास्त्रज्ञांमध्ये कशाबाबत एकवाक्यता नाही ?

7.

लॅमार्कला खालीलपैकी कशाचे श्रेय दिले जाते?

8.

खालील कोणते विधान योग्य आहे ?

(a) उष्ण रक्त प्राणी सर्वात अनुभवी असतात.

(b) उत्क्रांतीमध्ये असे गृहीत धरलेले आहे की सर्व सजीव एकत्र राहतात.

9.

खालील कोणते विधान अयोग्य आहे?

(a) चिंपांझी, गोरिल्ला व ओरँगउट्टान यांत अनुभवातून शिकण्याची क्षमता मानवापेक्षा कमी नाही.

(b) लॅमार्क, डार्विन व लिनेअस यांनी उत्क्रांतीची तत्वे मांडली.

10.

खालील कोणते विधान योग्य आहे ?

(a) मानवाने इतरांशी झगडूनच स्वत:चे स्थान मिळवले.

(b) उत्क्रांतीत निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे

प्रश्न क्रमांक 11 ते 15 :
            पृथ्वीवरील जनुकं, प्रजाती व परीसंस्था हे 300 दशलक्ष वर्षापासून सुरू असलेल्या उत्क्रांतीचे परिणाम आहेत आणि मानवजातीच्या अस्तित्वाचा पाया आहे. जैवविविधता ही अमुल्य आहे कारण तिचे भविष्यातील मूल्य सांगता येत नाही. अनुवंशिक विविधता ही सर्व प्रजातींकरिता खूप महत्वाची आहे. तिच्यामुळे वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होऊन सभोवतालच्या बदलाशी समायोजन करू शकतात. त्याबरोबरच लागवड केलेल्या व जतन केलेल्या प्रजातीमधील अनुवंशिक विविधता सामाजिक, आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वाची साधनसंपत्ती आहे. अनुवंशिक विविधतेशिवाय नवीन प्रजाती निर्माण करता येत नाहीत, अनुवंशिक विविधता नसतीतर जागतिक पातळीवरील अन्नाची निर्मिती सध्या आहे त्यापेक्षा खुप कमी झाली असती तसेच प्रजातींची भविष्यातील पर्यावरणीय बदलाशी समायोजन करण्याची क्षमताही खूप कमी झाली असती. ।
           जैवसंपदा ज्यामध्ये जनुकिय संपदा, एखाद्या प्रजातीची एकूण संख्या, जीव किंवा जैविक घटक, परिसंस्थेतील कोणताही घटक यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मानवासाठी उपयोग होतो हे सर्व घटक पुननिर्मितीक्षम आहेत. योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून निश्चितच मानवाच्या गरजा भागू शकतात. त्यामुळे ही संपदा व तिला आधार देणा-या संस्थांची विविधता ह्या शाश्वत विकासाचा पाया आहे.
            उपलब्ध पुराव्यानुसार, मानवाच्या कृतींमुळे जैवसंपदा उद्धवस्त होत असून पृथ्वीवरील जैवविविधता कमी होत आहे. सध्या प्रजातींचे हास होण्याचे प्रमाण किंवा त्यांच्या सद्यस्थितीचा अंदाज बांधणे आव्हानात्मक आहे. त्यावर लक्ष ठेवणारी पद्धतशीर यंत्रणा नसल्याने तसेच पायाभूत माहीतीचा अभाव असल्याने विशेषतः प्रजातींनी समृद्ध असलेल्या विषुवृत्तीय पट्टयात स्थिती गंभीर आहे.

             जैवविविधतेचा हास होण्यास आर्थिक कारणे कारणीभूत आहेत. विशेषत: जैवविविधतेला व परीसंस्थेतील कार्यांना दिले जाणारे कमी मूल्य उदा. जलसंवर्धन, जैवपोषक चक्र, प्रदूषण नियंत्रण, मृदा निर्मिती, प्रकाश संश्लेषण व उत्क्रांती यावर मानवाची समृद्धी अवलंबून आहे. त्यामुळे मानव समाजातील सर्व क्षेत्रांना जैवविविधतेचे संवर्धन करणे तसेच जैविक संसाधनांचा शाश्वत पद्धतीने वापर करण्यात उत्सुकता आहे. परंतु एक कोणताही घटक केवळ आपल्या बळावरच जैविक संसाधनांचे अशा
हेने व्यवस्थापन करू शकत नाही की जेणेकरून सर्व उत्पादने शाश्वत पद्धतीने उपलब्ध केली जातील, त्यासाठी संशोधनापासून ते पर्यटनापर्यंत सर्व क्षेत्रांचे सहकार्य आवश्यक आहे.

11.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) जैवविविधता राखण्यासाठी एकात्मिक मार्गाची गरज आहे.

(b) जैविक संसाधनांच्या संवर्धनात आर्थिक दृष्टिकोन अंतर्भूत नाही. 

12.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) विषुवृत्तीय पट्टयात जीवांची संख्या अमाप आहे.

(b) जैवसंपदेची कोणतीही मोजमाप/पहाणी केली जात नाही.

13.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
(a) विविध बाबींची आपली मुल्यांकन पद्धती निश्चितच चुकीची आहे.

(b) जैविक संसाधनांचा शाश्वत विकास मानव विकास/कल्याण सुनिश्चित करतो.

14.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) मानव निसर्गाचा शत्रू आहे.

(b) जैविक संसाधने मानवाच्या गरजा पुरवितात.

15.

खालील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) उत्क्रांतीशिवाय एवढी अन्न-धान्याची उत्पत्ती झाली नसती.

(b) अनुवंशिक विविधता क्वचितच समायोजित बदलाला सहाय्य करते. 

प्रश्न क्रमांक 16 ते 20 :
             त्रिस्तरीय लेझरच्या सर्वात सोप्या प्रकारात, अंशस्थिर अणूंच्या एकत्रीकरणातून निर्माण होणारी ऊर्जा, तिच्या निम्नतम स्थितीपेक्षा जास्त असुन सुद्धा तिचा हास स्थीर असतो. निम्नतम स्थितीत रूपांतर होण्यापेक्षा, स्थीर स्थितीत रूपांतर होण्यासाठी जास्तीत जास्त अणूंची गरज असते. जर सदरील माहिती नुसार आयोजन केले आणि एका विशिष्ट वारंवारतेचा प्रकाश अणूंच्या समुहावर चमकवला, तर निम्नतम स्थितीतील अणूंपेक्षा स्थौर स्थितीतील अणूचे जास्तीत जास्त उत्सर्जन होते. त्यामुळे मूळ प्रकाशात वृद्धी होते, लेझरची मुलभूत संकल्पना ही आहे. निम्नतम अवस्थेपेक्षा, अणूंच्या एकत्रीकरणामध्ये ऊर्जा पातळीचे अधिक्य जास्त असते. या संकल्पनेला ‘समष्टी व्यस्तता' असे म्हणतात. समष्टी व्यस्तता निर्माण करण्यासाठी 'प्रकाशीय पंपण' हे सर्वसाधारण तत्व वापरले जाते. त्रिस्तरीय लेझरमध्ये अध्र्यापेक्षा जास्त अणू स्थीर स्थितीत असतात प्रवर्तीत उत्सर्जन प्रबळ करण्यासाठी हा अभियोग चतु:स्तरीय लेझर पद्धतीत लागू पडत नाही. त्याचप्रमाणे, लेझरचे परिवहन अस्थिर स्थितीतून स्थीर स्थितीत होण्या ऐवजी मध्य स्थितीतच संपूष्टात येते कारण मध्य स्थितीतील अणू स्थीर स्थितीमध्ये लौकरच समांवर्तित होतात म्हणून अस्थीर स्थितीत वाढ करण्यासाठी मर्यादशील पंपण प्रमाण पुरेसे असते.
 

16.

त्रिस्तरीय लेझर मध्ये, अंशस्थर अवस्था __________  मध्ये स्थिर असते.

17.

पंपण प्रक्रीयेचे कमीत कमी प्रमाण ___________ मध्ये आवश्यक असते :

18.

चतुःस्तरीय लेझर दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये, अंशस्थिर स्थितीचे परिवहन __________ संपुष्टात येते.

19.

प्रेरीत उत्सर्जन प्रक्रियेसाठी त्रिस्तरीय लेझर मध्ये __________ .

20.

त्रिस्तरीय लेझर पद्धतीतील समष्ठी व्यस्तेत __________ .

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.