राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

खाली दिलेले परिच्छेद वाचा आणि प्रत्येक परिच्छेदावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नमूद करा. ह्या प्रश्नांची उत्तरे परिच्छेदावर आधारित असली पाहिजेत. 
तेराव्या ते सोळाव्या शतकांदरम्यान युरोपातील सरंजामदार वर्गाने भूदासांच्या पिळवणुकीतून भरपूर धन कमावले. या साठवलेल्या भांडवलाचा नवनवीन बाबतीत विनियोग केला गेला. नवीन भूप्रदेश आणि मार्ग शोधणा-या लोकांना त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. कोलंबसने अटलांटिक महासागर ओलांडून नव्या जगाचा शोध लावला. वास्को द गामाने आफ्रिका खंडाला वळसा घालून भारत आणि पूर्वेशी व्यापाराचा सुरक्षित मार्ग शोधला. मॅगेलानच्या जहाजांच्या ताफ्यातील एक जहाज युरोपला परतल्यामुळे पृथ्वीला सागरी प्रदक्षिणा घालणे शक्य आहे हे सिद्ध झाले. साठवलेल्या भांडवलाचा आणखी एक उपयोग म्हणजे लिओनार्दो द व्हिन्सी, मायकेलांजेलो आणि राफाएल सारख्या महान कलाकारांना आश्रयदाते मिळाले. या कलाकारांनी चित्रकला आणि शिल्पकलेत क्रांती घडवली आणि मानवी शरीराचे अतिशय तपशीलवार चित्रण केले. आपल्या कलेमध्ये मानवी शरीराचे चित्रण तंतोतंत व्हावे यासाठी दे व्हिन्सीसारख्या कलाकारांनी शरीरशास्त्राचाही अभ्यास केला.
                   या काळात केवळ शरीरशास्त्राचाच विकास झाला असे नाही. परीस आणि अमृत यांच्या शोधात असणा-या किमयेच्या अभ्यासकांना फॉस्फोरस सारख्या मूलतत्त्वांचा शोध लागला आणि रसायनशास्त्राचा विकास झाला. कोपरनिकस ने पृथ्वी नव्हे तर सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंन्द्रस्थानी आहे असा सिद्धांत मांडला. गॅलिलिओ आणि केपलर सारख्या वैज्ञानिकांनी त्याचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा उपयोग केला. निसर्गरूपी ग्रंथ हा गणिताच्या भाषेत लिहिलेला आहे, असे त्यांना वाटत होते. वेगवेगळ्या शोधांखेरीज खुद्द शास्त्रीय पद्धतीचाही विकास या काळात होत गेला. वैज्ञानिक कल्पना मांडत, ती सिद्ध करण्यासाठी प्रयोग करत, प्रयोगाचा तपशील नोंदवत आणि या नोंदी त्या-त्या क्षेत्रात काम करणाच्या इतरांना चिकित्सेसाठी खुल्या ठेवत. माणसाकडे या जगात सुधारणा घडवण्याची जवळजवळ अमर्याद क्षमता आहे, असे त्यांना वाटत होते. या काळात चर्च धर्मसंस्था जरी अतिशय श्रीमंत आणि शक्तिशाली असली, तरी नियतीवर आंधळा विश्वास ठेवत जगण्याला या लोकांनी नकार द्यायला सुरवात केली आणि चिकित्सक वृत्तीचा उदय झाला. मानवतावादाच्या नवीन तत्त्वज्ञानाने माणसाच्या व्यक्तीगत क्षमता आणि प्रयत्नांवर भर दिला. युरोपीय अभ्यासकांनी अभिजात ग्रीक आणि रोमन ग्रंथांना पुनरुज्जीवित केले आणि गुटेनबर्गने विकसित केलेल्या छपाईच्या नव्या तंत्राच्या मदतीने त्यांना सगळी कडे लोकप्रिय केले. रेनेसां या शब्दाचा अर्थ आहे पुनरुज्जीवन, या सगळ्या एकमेकांत गुंतलेल्या प्रक्रियांना एकत्रपणे रेनेसां - पुनरुज्जीवन म्हणतात.

1.

पुनरुज्जीवन म्हणजे

अ. ग्रीक व रोमन साहित्याची सुरुवात

ब. चिकित्सक वृत्तीचा उदय

क. मानवतावादाचा विकास

ड. चर्च/धर्मसंस्थेचा ह्रास

2.

वरील उता-यानुसार मानवतावादात कशाचा अंतर्भाव होतो ?

अ. व्यक्तीच्या भांडवलाचे महत्त्व

ब. व्यक्तीच्या प्रयत्नांचे महत्त्व

क. छपाईचे नवे तंत्र लोकप्रिय करणे

ड. माणसाच्या क्षमतेवर विश्वास

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ? 

3.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. पूर्वी पृथ्वी सूर्यमालेच्या मध्यभागी मानली जायची.

ब. चर्चची श्रीमंती नंतर कमी झाली.

4.

वरील उता-यानुसार कोणती विधाने सत्य आहेत ?

अ. विज्ञानाच्या विकासाचा कलांच्या विकासाशी निकटचा संबंध असतो.

ब. शरीरशास्त्राच्या अभ्यास चित्रकला व शिल्पकलेला आवश्यक आहे.

क. छपाई तंत्रज्ञानातील बदलांचा युरोपातील पुनरुज्जीवन घडवण्यात महत्त्वाचा सहभाग होता.
ड. भांडवल हे कला व वैज्ञानिक प्रगतीला चालना देऊ शकते.

5.

पुढील विधानापैकी कोणती सत्य आहेत ?

अ. गुटेनबर्गने छपाईयंत्राचा शोध लावला.

ब. नवीन मार्ग शोधण्याकरता लागणाच्या आर्थिक पाठबळासाठी युरोपियन सरंजामदारांनी भूदासांची पिळवणुक केली. 

प्रश्न क्रमांक 6 ते 10:
                मानवाला काही निसर्गदत्त हक्क असतात. जगातील सर्वच देशांमधील नागरिकांना ते प्राप्त झाले पाहिजेत या हेतुने मानवी हक्क” ही संकल्पना आधुनिक काळात प्रचलित झाली. जीवित, उपजीविका यांच्या बरोबर भाषण, संघटना आणि धर्मश्रद्धा स्वातंत्र्य यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश होतो. इंग्लंडमध्ये 1215 मध्ये “मॅग्नाकार्टा” या नावाने ओळखला जाणारा कायदा संमत झाला. तेव्हापासून राज्यसंस्थेच्या अधिकारावर बंधने असावीत ही कल्पना जन्माला आली. 1628 मधील पिटीशन ऑफ़ राईट्स आणि 1689 मधील बिल ऑफ़ राईट्स ने त्यात अधिक स्पष्टपणा आणला. अमेरिकन स्वातंत्र्य आणि अमेरिकेतील मूलभूत स्वातंत्र्याचा जाहिरनामा यातही मानवी हक्कांचे रक्षण हा ही हेतु होता.
                1948 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला आणि त्याच वेळेस भारतास स्वातंत्र्य मिळाल्यामुळे संविधान तयार करण्याचे काम सुरु होते. घटनाकारांवर या जाहिरनाम्यातील तरतुदींचा प्रभाव होता आणि म्हणूनच त्यातील काही तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या तिस-या भागात केलेल्या आहेत. घटनेतील कलम 32 नुसार मानवी हक्क जे मूलभूत हक्क म्हणुन नागरिकांना दिलेले आहेत त्यांचे उल्लंघन झाल्यास त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. आंतरराष्ट्रीय दबाव व घडामोडीमुळे 1993 मध्ये भारतात मानवी हक्क संरक्षण कायदा पारित करण्यात आला. या कायद्यानुसार राष्ट्रीय व राज्य मानव हक्क आयोगांची स्थापना करण्यात आली. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय किंवा राज्य मानव हक्क आयोगाकडे तक्रार करुन दाद मिळू शकते.
                  भारतात स्त्रियांचे मानवी हक्क उल्लंघन भरमसाठ प्रमाणावर होतांना दिसते. स्त्रियांना मानवी हक्कांबाबत संवैधानिक तरतुदींबरोबर शासनाने विशेष कायदेही पारित केले असले तरी समाजाची मानसिकता ही पुरुष प्रधान असल्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. विख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी 1992 मध्ये ब्रिटिश जर्नलच्या अंकात “मिसिंग वुमेन” हा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी दहा कोटी स्त्रिया हरवल्या असा उल्लेख केला होता. हरवल्या म्हणजे जन्माला येण्याआधीच गर्भावस्थेत स्त्री गर्भ म्हणुन त्यांची भ्रूण हत्या केली गेली. शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे साधन आहे. त्या माध्यमातुन स्त्रियांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण शक्य आहे. विशाखा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक छळाबाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आजही बहुतांश रोजगाराच्या ठिकाणी लागु झालेली नाही म्हणुन समाजात आणि विशेषत: महिलांमध्ये महिलांविषयक कायद्यांची जागृती करणे गरजेचे आहे.

6.

योग्य वाक्य निवडा. 

अ. सर्व मानव हक्क हे कायदेशीर हक्क आहेत.

ब. सर्व मानव हक्क हे मूलभूत हक्क आहेत.

क. सर्व मूलभूत हक्क हे मानव हक्क आहेत. 

7.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. स्त्रियांचे मानवी हक्क उल्लंघन फक्त स्त्रियांचे शिक्षण रोखू शकते.

ब. दुस-याकोणाही पेक्षा स्त्रियांनी महिलाविषयक कायद्यांबाबत अधिक जागृत असावयास हवे.

8.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध लगेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.

ब. अमेरीकनांना स्वातंत्र्य मानवी हक्कांच्या रक्षणाकरताच मिळाले.

9.

सर्व मूलभूत अधिकार हे 

10.

महिला सबलीकरण यामुळे होऊ शकते

प्रश्न क्रमांक 11 ते 15 :
                प्रेम करणे चांगलं ही आहे कारण ते करणं कठीण असतं. एका माणसाने दुस-या माणसावर प्रेम करणे ही बहुतेक आपल्यावर सोपवलेली व, आपली अंतिम परीक्षा घेणारी तसेच आपल्या क्षमतेचा पुरावा देणारी सर्वात कठीण जबाबदारी आहे. इतर सर्व कामे ही फक्त प्रेमाची तयारी म्हणूनच करायची असतात. सर्वच बाबतीत नवोदित असलेल्या, ज्यांच्यात अजून प्रेम करण्याची ताकद नाही, अशा तरुण माणसांनी म्हणूनच प्रेम करायला शिकले पाहिजे. त्यांनी स्वत:च्या सर्वस्वानिशी, एकाकी, आतुर आणि अधिकाधिक स्पंदनशील होत जाणाच्या हृदयासोबत स्वत:ची सर्व ताकद एकवटून प्रेम करणे शिकायला हवे. परंतु प्रेम शिकण्याचा कालखंड नेहमीच लांब पल्ल्याचा, एकांताचा व जीवनाचा मोठा भाग व्यापणारा असतो. प्रेम करणा-या व्यक्तिसाठी एकांत म्हणजे एकप्रकारे उच्च पातळीचा व सखोल असा एकटेपणाचा अनुभव असतो. मुळातच प्रेम म्हणजे दुस-यात विरघळून जाणे, स्वत:ला समर्पित करणे, किंवा त्याच्याशी एकात्म होणे नव्हे (कारण स्वत: नीट न ओळखणारी, अपरिपक्व आणि अजूही एकस्पंद नसलेली दोन माणसे एक कशी होवू शकतील ?) प्रेम ही तुम्हाला परिपक्व होण्यासाठी, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी, स्वत:चे असीम विस्तारण्यासाठी, दुस-यांसाठी अवघे विश्व बनण्याची उच्च प्रेरणा देणारी गोष्ट आहे. प्रेम विशाल आहे. ते माणसाकडून फार मोठ्या अपेक्षा करते. ते माणसाची निवड करते आणि त्याला तपस्या करावयास लावते. केवळ या दृष्टीने स्वत:ला घडवण्याच्या कामात स्वत:ला गुंतवून घेताना (रात्रंदिवस लक्षपूर्वक ऐकत व स्वत:वर घणाचे घाव घालत) तरुणांनी स्वत:ला मिळणारे प्रेम उपयोगात आणावे. दुस-यात विखरून जाणे, दुसन्यासाठी मिटून जाणे किंवा कोणत्याही प्रकारे एकात्म होणे यापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले पाहिजे (कारण त्यांना अजूनही खूप, खूप लांब जायचे आहे व त्यासाठी स्वत:ची सर्व ताकद वापरायची आहे.) प्रेम जीवनाचे अंतिम स्वरूप आहे. ते एका आयुष्यात पूर्णत्वाला जाईल असे नाही.

11.

लेखकाच्या विचारानुसार दुस-या व्यक्तीवर प्रेम करणे कठीण काम आहे कारण,

अ. कोणत्याही हेतूशिवाय वा ध्येयाशिवाय कोणीही दुस-या व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही.

ब. ते प्रेमाची अंतिम परीक्षा आहे ज्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला इतर सर्व कामे करून स्वत:ला तयार करावे लागते.

क. ते शिकायला खूप वेळ लागतो आणि धीर धरून चिकाटीने काम करत रहाणे कठीण असते.

ड. त्यासाठी व्यक्तीला स्वत:च्या सर्व शक्ती एकवटाव्या लागतात व इतर कामे करण्याचे कष्ट करावे लागतात.

वरीलपैकी कोणती कारण/णे योग्य आहेत ?

12.

प्रेम करायला कोणीही कसे शिकतो ? 

13.

“दुस-यांसाठी स्वत:च अवघे विश्व बनणे म्हणजे प्रेम करणे,” असे लेखक लिहितो तेव्हा त्याला काय म्हणायचे असावे ?

14.

लक्षपूर्वक ऐकण्याने व घणाचे घाव सोसण्याने तरुण व्यक्ती कशाप्रकारे दुस-यावर प्रेम करायला सक्षम होऊ शकतील ?

15.

लेखक लिहितो, "...प्रेम करायला शिकण्यासाठी प्रत्येकाला बराच मोठा काळ तर कधी पूर्ण जीवन एकाकी व्यतीत करावे लागते ...”, याचा अर्थ-लेखक असे गृहीत धरतो की ...

अ. इतरांच्या सहवासात गोष्टी शिकणे शक्य होत नाही कारण इतर व्यक्ती आपले विचार प्रभावित करतात.

ब. एकांतात व्यक्तीला स्वत:च्या व्यक्तिगत अनुभवांवर चिंतन व त्यांचे परीक्षण करायला वेळ मिळतो.

क. एकांतवास व्यक्तीला प्रेमाचा वेगळा अर्थ विचारात घेणा-या, जो तिच्या स्वत:च्या अर्थाशी जुळत नाही,
अशा व्यक्तींपासून सुरक्षित ठेवतो.

ड. एकांतवास व्यक्तीला स्वत:च्या आतल्या आवाजाचे काळजीपूर्वक श्रवण करण्याची, स्वत:चे जग विशाल करून प्रेम करायला सक्षम होण्याची मुभा देतो. 

प्रश्न क्रमांक 16 ते 20 :
                एकूणच वृद्धी व स्पर्धेत चढाओढीचा लाभ या साठीच नव्हे तर भारताचा भविष्यातील विकास हा शाश्वत व सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने भारतात नवोपक्रम किंवा नवता ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्या देशात आरोग्य, शिक्षण, शेती, उर्जा आणि कौशल्ये या अत्यंत महत्वाच्या विभागामध्ये गरजपूर्तीचा अभाव दिसून येतो. लोकसंख्येच्या दृष्टीनेही या देशात अनेक आव्हाने आहेत. उदा. 55 कोटी लोकसंख्या ही 25 पेक्षा कमी वयोगटात मोडणारी असल्याने त्यांना संधींची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. त्यांचे साठी वर्ग, जात, लिंग, प्रदेश अशा बहुविध अंगाने विषमता वाढीचे आणि विकासाचे आव्हान तर आहेच, त्याबरोबरच आत्यंतिक दारिद्रयात अडकलेल्या कोट्यावधी नागरिकांना दारिद्रयरेषेच्या वरती आणणे ही तातडीची गरज आहे.
                   नवोपक्रम (Innovation) हेच या अत्यंत दबावात्मक आव्हानाना सामोरे जाण्यासाठीचे उत्तर आहे व सर्वच उपक्रमांचा केंद्र बिंदू आहे. ज्ञानार्धारित अर्थव्यवस्था तयार होत असतांना त्यातून निर्माण होणा-या लाभांचे वितरण होण्यासाठीही संधी संरचना निर्मिती अशाच नवोपक्रमातून होत असते. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील परवडण्याजोगे उपाय, नाविण्यपूर्ण व्यवसायिक प्रतिमाने किंवा प्रक्रिया यातूनच सर्वसामान्य नागरिकांना सेवा प्राप्त करून घेणे सुलभ जात असते व कामाच्यापरंपरागत मार्गांपलीकडे जावून अधिकाधिक लोक विकास प्रक्रिये मध्ये सहभागी होत असतात.
                    तथापि आपली एकमेव गरज म्हणजे नवोपक्रमाच्या नव्या प्रतिमानाचा शोध घेणे ज्याचा भर हा सर्वसामान्याना पखडणारा व सर्वसमावेशक वृद्धी बरोबर त्रिकोणाच्या सर्वात खाली असलेल्या कमी उत्पन्न असणा-यांना दारिद्रयातून व अभाव स्थितीतून वरती काढणे हा असेल.
                  दुर्देवाची गोष्ट म्हणजे. मागील कितीतरी दशकांत नवोपक्रम व संशोधन यांनी विकसितांच्या मागणीलाच प्राधान्य दिले श्रीमंतांच्या इच्छापूर्ती बरच अधिक भर दिला असून बौद्धिकता व भांडवल यांची संपूर्ण व्यवस्था त्यांचे समाधान करण्यासाठीच वापरली जात आहे. भारताला हा मार्ग स्वीकारता येणार नाही. त्यापेक्षा आपल्या देशातील संशोधन व नवोपक्रमांनी गरीबांवर आणि गरीब जनतेच्या अत्यावश्यक गरजावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. परंपरागत जुना सधन उपभोगाचा दृष्टिकोण आता चालणार नाही.
                 आपली प्रचंड लोकसंख्या आणि त्यांच्या अमाप गरजा लक्षात घेता आपल्या नवोपक्रमांनी दुर्मिळ संसाधने काटकसरीनेच वापरली पाहिजेत व सर्वांना परवडणारी आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत अशी आपली संशोधन व नवतेची दिशा असावी भारताचे राष्ट्रीय नवता महामंडळाचे कामकाजही हीच विचारसरणी दाखवते. विकसित भारतासाठी लोकाचे-लोकांसाठी-लोकांनी तयार केलेले नवतेचे प्रतिमान विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्ञाननिर्मितीत जेथे लोकच लाभार्थी आहेत अशाच सर्वसमावेशक दृष्टीकोनातूनच आपण अधिकाधिक शाश्वत विकासाचे प्रतिमान निर्माण करू
शकू.

16.

भारतात कौशल्य विकासाचा कार्यक्रम महत्वाचा आहे कारण

17.

पुढील कोणते विधान योग्य आहे ?

अ. आत्ता पर्यंत आपण केवळ पुढारलेल्या राष्ट्रांच्या गरजा पुरविल्या.

ब. सध्याच्या आपल्या विकासाच्या मॉडेलने आपल्या पर्यावरणाचा -हास झाला.

18.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. सर्वकष विकासासाठी आपण गरीबी व लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करायाला हवे.

ब. कमीत कमीतून अधिकाधिक उत्पादनाचा आपण प्रयत्न केला पाहीजे.

19.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. विना नवता आपण विकास साधू शकत नाही.

ब. आत्ता पर्यंत भारताचा विकास सर्वकष नव्हता.

20.

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

अ. आत्ता पर्यंत आपण नक्ताकडे पुरेसे लक्ष पुरवीत नव्हतो.

ब. लोकांच्या सहभागानेच आपण शाश्वत विकास गाठू शकू.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.