राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

प्रश्न क्रमांक 21 ते 25 :
              एरोसोल म्हणजे वायुतील द्रवरूपांचे अपस्करण (धुके आणि बहुतांश तुषार) आणि वायुरूपांतरीत घन (धुर). सुक्ष्मदर्शकामुळे ती बघितल्या जाऊ शकण्या इतके ते कण मोठे असतात. द्रवरूपाने होणारे विघटन म्हणजे इमल्शन होय (जसे कि दुध). एरोसोल तयार करण्याची प्रक्रिया शिंक (जी एरोसोल तयार करते) येण्याइतकी सोपी असू शकते. प्रायोगिक आणि व्यवसायिक तत्वांवर बहुतांश पद्धती वापरल्या गेल्या आहेत.
            रासायनिक अवक्षेपण कधीकधी श्लेश्मात्र निर्माण करते. सिल्वर आयोडाइड सारखे तयार झालेले अवक्षेप पेप्टीकरणाच्या समावेशामुळे (उदा. पोटॅशिअम आयोडाईड) विकिरित केले जातात. चिकण मातीचे पेप्टीकरण आल्क ने केल्या जाऊ शकते ज्यात, हायड्रॉक्सिल आयन प्रखर अभिकर्ता असतो.
           सामान्यतः दोन घटकांच्या एकत्रित मिश्रणाने इमल्शन उत्पादित केले जातात जरी काही इमल्सिफाईंग अभिकर्ते हे उत्पादनांच्या स्थिरीकरणासाठी वापरले जातात. हे इमल्सिफायर साबण (मेदाम्लची लांब सारवळी), सर्फेक्टंट किंवा लियोफिलिक सोल जे विकिरित रूपास संरक्षित फिती तयार करते, असू शकते.
              दुधात जे कि मेदाचे पाण्यामधील इमल्शन आहे इमल्सिफाईंग अभिकर्ता केसिन आहे, जे असे प्रथिन आहे कि ज्यामध्ये फॉस्फेट घटक आहे. हे केसिन दुधाच्या पुर्णपणे स्थिरीकरणासाठी उपयुक्त नसल्याने पृष्ठभागावर साईची निर्मिती होते : थेव सांघले गेल्याने निर्माण झालेले विखुरलेले मेद पृष्ठभागावर तरंगतात.
             नलिकेद्वारे निघणा-या पाण्याचे (तुषारांचे) वायूरूपातील शुन्यांकणांमुळे एरोसोल तयार होतो. त्या द्रवअंशावर विद्युत स्थितिक स्थापत्वाचा मारा केल्यास अपघटनास सहाय्य होते कारण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रतिसारण नलिकेस आघात करून लहान थेंबात रूपांतर करते. ही कृती इमल्शन च्या उत्पादनात वापरली जाते कारण विद्युत स्थितिक रूप दुस-या द्रव्यात चिरकांडीप्रमाणे टाकल्या जाते. श्लेश्मात्र शुद्धीकरण ज्या श्लेशणांने अनेकदा केले जाते. डोनन परिणामांत असा पडदा (उदा. सेल्युलोज) निवडला जातो ज्यातुन द्रावक व आयन्स झिरपू शकतात परंतु श्लेश्मात्रकण झिरपू शकत नाहीत. ही प्रक्रिया अतिशय संय असून विद्युत संचारा मुळे व इलेमात्रावरील विद्युत भार यांमुळे सर्वसाधारणपणे ती प्रभावी होते व ती विद्युत व्याश्लेषण अशी संबोधिली जाते.
 

21.

व्याश्लेषणाचा दर हा _____________ च्या मदतीने वर्धित केला जाऊ शकतो 

22.

पायस (इमल्शन) प्राप्तीकरीता कोणत्या पदार्थाचे तयार करण्याचे समांतर पद्धती तत्व वापरले जाऊ शकते ?

23.

दुधाच्या पृष्ठभागावर प्राप्त होणारे दुग्धसारण हे 

24.

मुळे वायुरूपातील द्रवरूपाच्या अपस्करणातुन एरोसोल तयार होतात

25.

हा अभिकर्ता ओल्या मातीच्या आल्कधर्मी पेप्टीकरणाच्या प्रक्रियेत कार्यक्षम असतो

प्रश्न क्रमांक 26 ते 30 :
                                                       शास्त्राची सुरवात
                 आंतरराष्ट्रीय राजकारणाचे शास्त्र बाल्यावस्थेत आहे. भूतकाळात, म्हणजे 1914 च्या सुमारास आंतरराष्ट्रीय संबंध त्यामध्ये व्यावसायिक दृष्टया गुंतलेल्या लोकांचा मामला होता. लोकशाही देशांमध्ये परंपरेने परराष्ट्र धोरण हे पक्षीय राजकारणाच्या व्याप्तीच्या पलीकडले मानले गेले; आणि परराष्ट्र खात्यांच्या गुढ व्यवहारांवर बारिक नियंत्रण ठेवण्यास आपण सक्षम आहोत असे प्रातिनिधिक संस्थांना वाटत नव्हते. ब्रिटीश नाविक दलाने आपल्या संभाव्य शत्रुच्या संदर्भात असलेले वर्चस्व जे त्या काळात आवश्यक मानले जावयाचे काही काळासाठी जरी गमावले, किंवा परंपरेने ब्रिटीशांचे हित संबध असलेल्या वा तसे मानले गेलेल्या प्रदेशात युद्ध सुरू झाले तर ब्रिटीश जनमत सहज प्रक्षोभित होत असे. सक्तीची लष्कर भरती आणि वर्षानुवर्षे परकीय आक्रमणाची भीती यामुळे युरोपच्या खंडीय भागात लोकांमध्ये एक सर्वसाधारण, सततची आणि सहज अशी आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधीची जाणीव होती. परंतु या जाणीवेची अभिव्यक्ती मुख्यतः कामगार चळवळीच्या माध्यमातून होत असे ज्यायोगे कामगार चळवळीने वेळोवेळी पोथीनिष्ठ असे युद्धविरोधी ठराव पारित केले. अध्यक्षांनी सिनेटच्या (वरिष्ठ सभागृह) सल्ल्याने आणि मान्यतेने करार पूर्ण करावेत अशी अद्धितीय तरतूद अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये होती. परंतु या अपवादात्मक तरतूदीला व्यापक महत्त्व प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे परराष्ट्र संबंध अत्यंत तोकडे होते. राजनयाच्या रंगतदार पैलूंना मात्र बातमीचे मूल्य होते. परंतु विद्यापीठात काय किंवा बुद्धीवाद्यांच्या व्यापक वर्तुळांमध्ये काय, वर्तमान आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सुसंबद्ध अभ्यास केला जात नव्हता. युद्ध हे अजूनही मुख्यतः सैनिकांचे काम मानले जात होते; आणि त्या ओघानेच आंतरराष्ट्रीय राजकारण हे राजनैतिक अधिका-यांचे काम मानले गेले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संचालन व्यावसायिकांच्या हातून काढून घ्यावे किंवा ते काय करीत आहेत त्याकडे गंभीरपणे आणि पद्धतशीरपणे लक्ष द्यावे अशी सर्वसाधारण इच्छाही नव्हती.

26.

आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधी कोण अधिक जागरूक होते ? 

27.

उता-यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की युरोपमधील कामगार वर्गाचे नेते ____________ होते.

28.

खालील पैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

अ. विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांमध्ये लोकशाही राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा सखोल अभ्यास झाला.
ब, युरोपीय देशांचे परराष्ट्र धोरण त्यांच्या कडील कामगार चळवळी ठरवीत होत्या.
क. अमेरिकेच्या राज्यघटनेने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले.
ड. विद्यापीठे आणि बुद्धीवाद्यांच्या वर्तुळांचा परराष्ट्र धोरण ठरविण्यात नगण्य प्रभाव होता.

29.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये परराष्ट्र धोरण हे ____________ क्षेत्र होते.

30.

उतारा सुचवितो की 

अ. युरोपमधील जनता सशस्त्र दलांमध्ये काम करण्यास अनुत्सुक आहे.

ब. युरोपीय देशांमध्ये परकीय आक्रमणे ही नित्याची बाब होती.

क. युरोपीय कामगार मुख्यतः परराष्ट्र धोरणाबद्दल बोलत होते.

ड. अमेरिकेकडे सुस्थापित असे परराष्ट्र खाते होते.

प्रश्न क्रमांक 31 ते 32 :
           जैविक इंधन हे असे इंधन आहे ज्यामध्ये अलिकडील भूगर्भिय काळामध्ये होणाच्या कार्बन स्थिरीकरणामुळे उर्जा निर्माण होते. उदाहरणार्थ वनस्पती, जैविक इंधन हे जीवंत जीवाणू निर्माण करतात, कार्बन स्थिरीकरणाचे उदाहरण म्हणून वनस्पती, शेवाळ व जीवंत जीवाणू यांची नावे घेता येतील, जैविक इंधन हे बायोमासच्या रूपांतरणामुळे तयार होते. (बायोमास म्हणजे अलिकडील काळातील जीवंत जीवाणू, वनस्पती व वनस्पती जन्य पदार्थ), बायोमास रूपांतरणाच्या तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत, औष्णिक रूपांतरण, रासायनिक रूपांतरण आणि जीवरासायनिक रूपांतरण, बायोमास रूपांतरण पदार्थाच्या तिन्ही अवस्थांमध्ये शक्य आहे ठोस, द्रव आणि वायू. तयार झालेले नवीन बायोमास जैविक इंधनासाठी वापरले जाऊ शकते. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे व ऊर्जा सुरक्षेच्या कारणाने जैविक इंधनचा वापर अधिक लोकप्रिय होऊ लागला. बायोइथेनॉल हे किण्वन ह्या प्रक्रियेद्वारे तयार होते व ते शर्करायुक्त पिष्टमय वनस्पतीतून प्राप्त झालेल्या कार्बोहाइड्रेटस मधून मिळते उदाहरणार्थ मका, उस, ज्वारी इत्यादी. अन्नधान्य नसलेल्या वनस्पती, म्हणजेच काही वृक्ष गवताचे प्रकार, यांचा सेल्युलोज युक्त बायोमास बायोइथेनॉल निर्मीतीसाठी कच्चा माल म्हणून वापर होतो. शुद्ध स्वरूपातील इथेनॉल तसे वाहनांसाठी इंधन म्हणून वापरता येणे शक्य आहे परंतु सद्यपर स्थितीत ह्याचा गैसोलीन मिश्रीत म्हणून अधिक वापर केला जातो, त्यामूळे ऑक्टेन संख्या वाढते तसेच वाहनांच्या वायू उत्सर्जनात सुधारणा होते. बायोइथेनॉल अमेरीका व ब्राझील ह्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. सध्या अवगत असलेल्या कार्यपद्धती मध्ये वनस्पतीजन्य कच्या मालामधील लिग्नीन ह्या घटकाचा किण्वन प्रक्रियेने तयार केलेल्या जैविक इंधन निर्मितीमध्ये सहभाग होऊ शकत नाही. बायोडिझेल शुद्ध स्वरूपामध्ये वाहनांचे इंधन म्हणून वापरता येणे शक्य आहे परंतु त्याचा बहुतांशी डिझेल मिश्रीत म्हणून वापर होतो. ह्यामुळे डिझेल वाहनांमधून उत्सर्जित होणा-या सुक्ष्मकण, कार्बन मोनॉक्साईड व हाइड्रोकार्बनच्या प्रमाणात घट होते. बायोडिझेल तेल व चरबीयुक्त पदार्थापासून ट्रान्सईस्ट्रीफिकेशन ह्या प्रक्रियेद्वारे तयार केले जाते आणि ते युरोपमध्ये सर्वसाधारण पणे वापरले जाणारे इंधन म्हणून प्रचलित आहे. 

31.

पुढील कोणते विधान योग्य आहे ?

अ. कार्बन स्थिरीकरण तुलनेने ताजी बाब आहे.

ब. प्रत्येक औष्णिक, रासायनिक व जैवरासायनिक रूपांतर स्थायू, द्रव व वायूरूपी इंधन तयार करते.

32.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. पूर्वी जैविक इंधन तयार होत नव्हते.

ब. जैविक इंधन अजैविक बाबीं पासून मिळू शकत नाही.

प्रश्न क्रमांक 33 ते 37:
                 समाजातील भूमिका - भूमिकांत, समूहा - समूहांत वा सामाजिक संस्थांमध्ये सापेक्षतः स्थिर स्वरूपाचे परस्परसंबंध असतात. या स्थिर स्वरूपाच्या घटकांतील परस्परसंबंधांनी संरचना बनते. आता, या संबंधांना स्थिरत्व (stability) कशामुळे येते ? 'सामाजिक नियमनांमुळे' (social norms) असेच याचे उत्तर द्यावे लागेल. सामाजिक नियमने हा समाज-संरचनेचा एक महत्त्वाचा घटक ठरतो तो यासाठीच. 
             सामाजिक नियमने म्हणजे समाजातील विविध भूमिका वठविणा-या व्यक्तींनी परस्परांशी कसे वागावे याविषयीचे नियम होत. म्हणजेच ते वर्तनविषयक नियम असतात. समाजातील सामाजिक स्थाने व्यक्ती भूषवितात व स्थानाला दर्जा व भूमिका हे दोन पैलू असतात. ह्या सामाजिक स्थानांचा आशय (content) सामाजिक नियमने हाच असतो. उदा. पित्याची भूमिका म्हणजे पित्याने आपल्या मुलाशी कसे वागावे याविषयीच्या अपेक्षा होत. कोणत्याही समूहातील विविध भूमिका परस्परसंबंधित असतात व सामाजिक नियमने म्हणजे या परस्परसंबंधांचे नियम असतात, पति-पत्नी, बहीण-भाऊ, वडील-मुलगा, यांनी परस्परांशी कसे वागावे याबद्दल सामाजिक नियमने ही मार्गदर्शक तत्त्वे किंवा वर्तनविषयक आदर्श असतात.
              सर्वच मानवी समाजात सामाजिक नियमने असतात आणि त्यांना संपूर्ण समाजाचा पाठिंबा असतो. वर्तन दिसते तसे हे वर्तनविषयक नियम दिसत नाहीत, म्हणजेच नियमने अमूर्त असतात. व्यक्तीच्या वर्तनावर मर्यादा घालणारा आणि मनात बाळगलेला, अमूर्त आदर्श म्हणजे नियमन होय अशी नियमनाची व्याख्या जॉन्सन यांनी केली आहे. नियमने वर्तनाचे नियंत्रण करतात. नियमने निश्चयात्मक व निषेधात्मक अशा दोन्ही स्वरूपाची असतात. व्यक्तीने कसे वागावे हे सांगणारी नियमने म्हणजे निश्चयात्मक नियमने, उदा. विद्याथ्र्यांनी शिक्षकांच्या आज्ञा पाळाव्यात. तर निषेधात्मक नियमने व्यक्तीचे वर्तन कसे नसावे, तिने कसे वागू नये हे सांगतात. उदा. चोरी करू नये, शिक्षकांशी उद्धटपणे वागू नये इ. सामाजिक नियमने स्थळ, काल, परिस्थिती आणि सामाजिक स्थानसापेक्ष असतात. परिस्थितीनुरूप, भूमिकेनुरूप, तसेच कालावघातकाळाप्रमाणे ती बदलतात. पण नियमने अचानकपणे बदलत नाहीत, ती सापेक्षतः स्थिर असतात. सर्व समाजातील नियमने एकसारखीच असत नाहीत. प्रत्येक समाजातील नियमनांचे स्वरूप भिन्न भिन्न असते. समाजीकरण प्रक्रियेत व्यक्तीकडून नियमनांचे आंतरीकरण होते. नियमनांचे विविध प्रकार आहेत. लोकरीति (Folkways), लोकनीति (Mores) व कायदे (Laws) या स्थूल गटात नियमनांचे वर्गीकरण समाजशास्त्रज्ञ करतात. समाजातील व्यक्ती व समूहांच्या वर्तनाचे नियमन करून समाजात व्यवस्था निर्माण करणे व समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणे ही महत्त्वाची भूमिका सामाजिक नियमने पार पाडतात.

33.

सामाजिक नियमनांना कसे संबोधिता येईल ?

अ. एखाद्या माणसाचे दुस-याशी असलेले नातेसंबंध

ब. परस्परांनी परस्परांशी कसे वागू नये याचे नियम

क. परस्परांशी कसे वागावे या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे

ड. सामाजिक वर्तनविषयक आदर्श 

34.

सामाजिक नियमने कशाचे नियंत्रण करतात ?

अ. मानवी परस्पर संबंधाचे

ब. मानवी स्वभावाचे

क. व्यक्तिच्या वर्तनाचे

ड. भिन्न भिन्न समाज गटाचे

35.

सामाजिक नियमने सामाजिक स्थानसापेक्ष असतात कारण

अ. ती व्यक्तिनुसार बदलतात

ब. प्रत्येक समाजातील नियमनांचे स्वरूप भिन्न भिन्न असते

क. ती स्थळाप्रमाणे बदलतात

ड. ती सापेक्षतः नेहमी स्थिर असतात

36.

सामाजिक नियमने कोणती महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

अ. समाजात स्थिरता

ब. सामाजिक संस्थांमध्ये स्थिर संबंध

क. समाजाला स्थैर्य

ड. समाजात सुव्यवस्था 

37.

सामाजिक नियमनात कशाचा समावेश होतो ?

a. सामाजिक संस्था परस्परसंबंध नियम

b. लोकरीती

c. समाज व्यवस्था 
d. सामाजिक कायदे

e. सामाजिक घाटणी

f. समाज सामंजस्य

g. लोकनीती

h. अमूर्त आदर्श 

Questions number 38 to 43 :
             Hyderabad sits nestled amongst one of the oldest rock systems of the world. These granite rocks are 2500 million years old. Rain, sun and wind have for aeons, through their collective and continuous physical and chemical actions, worked them into weird shapes. Some appear perched upon each other so precariously that you feel some giant-children playing at house making must have kept them there. From times immemorial they have stayed like that without tumbling down. They will remain like that long after we are gone.
            Golconda Fort was once a mere hillock, a hump of a giant camel, a mass of scattered misshapen granite. It was sheer wilderness. There cow and goatherds used to graze cattle and sheep belonging to the nearby villages. It was so popular with graziers that it took the name of 'hillock of the graziers' - Golla Konda in Telugu, the local language. Golla Konda later on became 'Golconda'. Hyderabad is the daughter of Golconda Fort which stands in ruins now, eight kilometres away from the centre of the city. The fort was built about a thousand years ago, during the Kakatiya rule (AD 1000 - 1321) which had its capital at Warangal - a city about 150 kilometres to the north of Hyderabad.
              Rudramba Devi, queen of the Kakatiya dynasty, ruled for 34 years froin AD 1262 to 1296. She withstood the combined attacks of the Pandyas, the Yadavas and the Hoysalas with the help of her grandson, Prataparudradeva who succeeded her (AD 1296 - 1323).
                He too was an illustrious ruler but was subjected to repeated attacks by the Sultans of Delhi: there were five during the two decades after AD 1303. Finally, he was defeated by Ulugh Khan, imprisoned and taken prisoner to Delhi. On the way he committed suicide. Ulugh Khan later became the Sultan of Hindustan, and is known as Mohammad Tughlaq. Since his empire had extended to the south, Delhi was no longer the centre of political gravity. He, therefore, ordered that the capital of India be shifted from Delhi to Daulatabad. For two decades this city remained the capital of India.

38.

Which of the following statements is false ?

39.

What is the meaning of the word 'aeon' used in the passage ?

40.

About Hyderabad, the passage states that :

a. It was built about a thousand years ago.

b. It was built during the Kakatiya rule.

c. It came into existence after Golconda was built.

d. It is to the south of Warangal.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.