राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खाली चार विधाने आणि चार निष्कर्ष I, II, III आणि IV दिलेले आहेत. दिलेल्या विधानांना सत्य मानून,
दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तर्कसंगत अनुसरण करतो/करतात, त्याबाबतचा योग्य पर्याय निवडा :

विधाने :

अ. सर्व कागद पुस्तके आहेत.

ब. काही पुस्तके पेन आहेत.

क. सर्व पेन पेन्सिली आहेत.

ड. सर्व पेन्सिली खोड रबर आहेत.

निष्कर्ष :

I काही खोड़ रबर कागद आहेत.

II. काही कागद पेन्सिली आहेत.

III. सर्व खोड़ रबर पेन आहेत.

IV. काही पेन कागद आहेत. 

62.

जाळीची दिलेली मालिका पूर्ण करण्यासाठी उचित प्रतिमा निवडा.

63.

विसंगत घटक निवडा.

64.

पहिल्या स्तंभातील शब्द, दुस-या स्तंभातल्याप्रमाणे गुप्तरितीत लिहिलेले आहेत. स्तंभ I आणि II मधील शब्द आणि अक्षरे यांचा क्रम तोच असेल, असे नाही. सांकेतिक भाषा ओळखून 'REACT" या शब्दाचा यथाक्रम संकेत दिलेल्या पर्यायांमधून शोधा :

65.

प्रश्नचिन्हा ऐवजी ठेवण्यासाठी योग्य प्रतिमा पर्यायांतून निवडा.

पर्याय :

66.

पुढे दिलेल्या वर्णाक्षराधारित मालिकेत, वरच्या ओळीत असलेली जोडी खालच्या ओळीत हवी आणि याच्या उलटही व्हायला हवे, वर-खाली होण्याची गरज असलेली जोडी निवडा.

CY, EV, LS, RJ, WM, DJ 

HA, LD, OG, QP, VM, ZP 

67.

पाच मैत्रिणी एकमेकींशी स्टॅपच्या खजिन्याविषयी बोलत होत्या. अन् दीपाला म्हणाली, 'जर तू मला आठ स्टॅप दिलेस तर तुझ्याकडे लाली इतके स्टॅप होतील. जर मी माझ्याकडचे सोळा स्टॅप तुला दिले तर तुझ्याकडचे स्टॅप शमाइतके होतील.' अनू आणि दीपाकडे मिळून. शमा आणि लालीकडे मिळून जितके स्टैंप आहेत त्यापेक्षा सहा स्टॅप कमी आहेत. जर दीपाकडे मेरीपेक्षा चार स्टॅप कमी असतील आणि या सर्वाकडे मिळून 149 स्टॅप असतील तर दीपाकडे किती स्टॅप आहेत ?

68.

मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे, तिघात मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांन मिळून एक श्रीखंडाचे भांडे, याप्रमाणे एकूण 108 भांडी पदार्थ मागवले. यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला व कमी पडला नाही तर एकूण किती कुटुंबिय मेजवानीला उपस्थित होते ?

69.

अक्षरांची पुढील क्रमणिका वापरून अक्षरसमूह मालिका रचली आहे.

         P A T N W G X M Q I R C H K J S Y U L Z V B F O

मालिका : P O Z T, ?, H Y J R, L C R U

प्रश्नचिन्हाच्या जागी तर्कशुद्ध पर्याय निवडा.

70.

जय गेव्हच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेव्हच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमनच्या दोघांची वये एकत्र केली की शम्मीच्या वयाची निमपट मिळते. जर शम्मीचे वय 70 असेल, तर गेरुहपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेव्हपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती ?

71.

पुढे एक विधान व त्यापुढे अ, ब व क ही गृहीतके दिली आहेत. तुम्ही ते विधान व गृहीतके सत्य मानायची आहेत आणि ती गृहीतके दिलेल्या विधानात अंतर्निहीत आहेत वा नाहीत याचा निर्णय घेऊन त्यानुसार पर्यायाची निवड करायची आहे.

विधान : दोन तृतीयांशापेक्षा अधिक लोकसभा सदस्य हे "x" या पक्षाचे सदस्य आहेत.

गृहीतके :

अ. x” पक्षाचा कोणीही सदस्य भ्रष्टाचारी नाही.

ब. निवडणूकीत फक्त 60% मतदारांनी मतदान केले.

क. लोकांनी "X" पक्षाला मते दिली कारण त्यांनी 'x' पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला.

72.

दीपक, 36,000 किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयांवर 8% सूट देतो. आणि नंतरच्या 10,000 रुपयांवर 5% सूट देतो. पूर्ण रकमेवर 7% सूट देऊन मिळणा-या रकमेइतकी रक्कम मिळविण्यासाठी राहिलेल्या 6,000 रुपयावर त्याने किती सूट द्यावी ?

73.

पिशवीत 5 पांढरे, 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीतून अनमाधबक्याने तीन चेंडू काढले. हे सर्व चेंडू निळे असण्याची संभाव्यता निर्देशित करणारा पर्याय निवडा.

74.

2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता ?

75.

एक छोटे विमान हवा स्थिर असताना 320 किमी/ताशी वेगाने जाते. हवा 40 किमी/ताशी वेगाने कायम वाहात आहे. वाहत्या हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करण्यास एकूण 135 मिनिटे लागतात. त्या विमानाला परतीच्या दिशेने हवेच्या दिशेते यात्रा करण्यास किती काळ (मिनिटात) लागेल ? (उड्डाण व जमिनीवर येण्यास लागणारा वेळ लक्षात न घेता) 

76.

तुमच्या भागात एक देऊळ आहे आणि अनेक भिन्न लिंगी व्यक्ती स्वत:च्या उपजीविकेसाठी येथे रहातात. त्यासाठी ते लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे उकळतात. विभागातील एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या मनोविज्ञान विभागाला या समस्येचा अभ्यास करून अहवाल तयार करायला सांगितला. या अहवालाच्या आधारे तुम्ही

77.

तुमच्या कचेरीतील एक व्यक्ती वेगळ्या वंशाची असून आणखी एक व्यक्ती दुसन्या धर्माची आहे. तुमच्या सहका-यांचा एक गट या दोन्ही व्यक्तींची त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या पेहेराव्यावरून चेष्टा करतात व त्यांना अस्वस्थ करतात. यावर तुम्ही,

78.

तुम्ही अशा भागात वसतीला आहात की जेथे पुढारी आणि गुंड यांनी संबंधित नागरी अधिका-यावर दबाव आणून अवैध बांधकाम केले आहे व फेरीवाले बसवले आहेत. जेव्हा तक्रार दाखल करण्याकरता, तुम्ही हे काम पाहात असलेल्या अधिका-याकडे गेलात तेव्हा तिने तुम्हाला सांगितले की तिला कोणतेही संरक्षण नसल्याने ती या लोकांविरोधात कोणतीही कृती करू शकणार नाही. तिने तुम्हाला असेही सांगितले की बहुधा शासन अशा अवैध कामांचे कायद्यात बदल करून त्यांचे कायदेशीर कामांत रूपांतर करते. तुम्ही यावर, 

79.

तुम्ही व तुमच्या मैत्रिणीने एका प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आहे आणि तुम्हा दोघांपैकी एकीची निवड करण्यासाठी दोघांनाही मुलाखतीला निमंत्रित केले आहे. ही शिष्यवृत्ती म्हणजे तुमच्या ज्ञानभाषक क्षमतेचे निर्देशन आहे. तुमची मैत्रिण ही तुमच्याइतकीच सक्षम आहे. ती वंचित समूहातून आलेली असून या पायरीला पोहोचण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने खूप कष्ट घेतले आहेत. या शिष्यवृत्तीची तिला खूपच गरज आहे आणि तरच तिला अभ्यास सुरू ठेवता येईल.

80.

विभागाचे जिल्हाधिकारी म्हणून तुमच्याकडे विशीतील मुलांनी स्त्रियांची छेड काढल्याच्या अनेक तक्रारी समाजातील अनेक गटांकडून आल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे की शाळा व महाविद्यालये पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही अध्ययन उपक्रमात गुंतवत नाहीत की ज्यामुळे त्यांची उर्जा व्यक्तिगत परिपूर्तीचे समाधान देणाच्या, समाजाच्या दृष्टीने उपयुक्त असणा-या, ज्यातून सर्जक व बौद्धिक कामाची मागणी होते अशा ठिकाणी प्रवाहित होईल. अनेक किशोरवयीन विद्यार्थी हे शाळा व महाविद्यालयांच्या बाहेर आहेत आणि ते कोणत्याही परिश्रमांशिवाय धनवान व ऐषोरामी जीवनाची स्वप्ने पाहत असतात. यावर तुम्ही कोणता उपाय करण्याला प्राधान्य द्याल ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.