राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

पुढील माहिती अभ्यासून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून उचित पर्याय निवडा

1. बेनिन हा देश नायजेरियाच्या पश्चिमेला व नायजरच्या दक्षिणेला आहे. 

2. घाना हा देश बेनिनच्या पश्चिमेला व मालीच्या दक्षिणेला आहे.

3. कॅमेरून हा देश बेनिनच्या दक्षिणेला व मालीच्या पूर्वेला आहे.

4. नायजेरिया हा देश मालीच्या दक्षिणेला व कॅमेरूनच्या पश्चिमेला आहे.

5. माली हा देश कॅमेरूनच्या पश्चिमेला व बेनिनच्या उत्तरेला आहे.

6.नायजर हा देश मालीच्या दक्षिणेला व कॅमेरूनच्या पश्चिमेला आहे.

पुढीलपैकी कोणता देश किमान एका देशाच्या उत्तरेला तसेच पूर्वेलाही आहे ?

62.

x हे एका समूहातील संयुक्त कुटुंब आहे. या समूहात बहुपतिकत्वाला आणि बहुपत्निकत्वाला मान्यता नाही. त्याचप्रमाणे भावंडाशी वा स्वत:च्या वा भावंडांच्या प्रत्यक्ष वारसदारांशी लग्न करता येत नाही. या कुटुंबात कोणत्याही व्यक्तीचे एकापेक्षा अधिक वेळा लग्न झालेले नाही व एकही मूल विवाहबाह्यसंबंधातून जन्मलेले नाही. विविध व्यक्तीतील पुढे दिलेले नातेसंबंध अभ्यासून समूहाच्या नियमाप्रमाणे D ही व्यक्ती ज्या व्यक्ती/व्यक्तींशी लग्न करू शकते ते दर्शवणारा पर्याय निवडा.

O ची आई L, जिने V शी लग्न केले आहे. ती D ची आई H हिची बहीण आहे. G व E यांना दोन मुले आहेत; पैकी M चे लिंग हे G च्या लिंगासमान आहे व K चे लिंग E च्या लिंगासमान आहे. O व O ची/चा जीवनसाथी Y यांना Q व R ही दोन मुले आहेत व त्या दोघांची ची लिंगे Y च्या लिंगासमान आहेत. O चे लिंग D च्या लिंगासमान आहे. E हा/ही G चा/ची जीवनसाथी आहे. P हा G व D या दोन समान लिंगी नसलेल्या व्यक्तींचा पिता आहे.

63.

अ, ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब आणि क नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अ नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासानी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीला असेल ?

64.

पुढे दिलेल्या आज्ञावलीत * हे चिन्ह “धावा” या आज्ञेचा संकेत आहे. त्याचप्रमाणे 3 हे चिन्ह “चाला” या आज्ञेचा, ७ हे चिन्ह “बसा” या आज्ञेसाठी, हे चिन्ह “थांबा” या आज्ञेसाठी व 1 हे चिन्ह उभे रहा” या आज्ञेसाठी वापरले आहे. जर मालिका सुरु ठेवली तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आज्ञा येईल ? 

65.

P हा पारदर्शक कागदाचातुकडा आहे आणि त्यावर काही घटक आपारदर्शक रंगांनी रंगवले आहेत. या कागदाला बाणांनी दाखवल्याप्रमाणे तीन घड्या दिलेल्या क्रमाने घातल्या. अंतिम घडीनंतर दिसेल असा पर्याय निवडा.

66.

6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करावयाची आहे. यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ?

67.

वर्णाक्षरांच्या गटासाठी वापरलेली प्रक्रिया प्रणाली अभ्यासून रिकाम्या चौकटीत भरण्यासाठी अक्षरगट निवडा. वर्तुळांकित संख्या प्रक्रियक आहेत.

68.

पुढील संख्यात्मक राशी बरोबर ठरण्यासाठी ज्या गणिती चिन्हांची अदलाबदल करायला हवी त्यांची जोडी दर्शवणारा पर्याय निवडा.

4 + 2 - 4 x 9 ÷ 12 = -22

69.

पुढे दोन विधाने व त्यानंतर त्यांच्यावर आधारित दोन निष्कर्ष दिले आहेत. निष्कर्षांचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा.

विधाने : 

1. खेड्यातील असे सर्व रहिवासी, ज्यांच्याकडे चारचाकी वाहने नाहीत, त्यांच्याकडे तीनचाकी वाहनेही नाहीत.

2. ज्यांच्याकडे दोनचाकी वाहने नाहीत त्यांच्याकडे फक्त तीनचाकी वाहने आहेत.

निष्कर्ष :

I. कोणाही गावक-याकडे चारचाकी व तीनचाकी अशी दोन्ही वाहने नाहीत.

II. काही गावक-याकडे फक्त दोनचाकी वाहने आहेत.

70.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

JEWQR : ? :: ? OYQFR 

71.

3, 4, 5, 6, 7 यापैकी एकावेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतात ?

72.

सोबतच्या आकृतीत फरशांनी आच्छादलेला भाग दाखवला आहे. प्रत्येक पाढ्या फरशीचे क्षेत्र प्रत्येक काळ्या फरशीच्या दुप्पट आहे. तर आकृतीतील एकूण काळ्या क्षेत्राचे सगळ्या पांढ-या फरशांनी आच्छादलेल्या क्षेत्राशी असलेले गुणोत्तर दाखवणारा पर्याय निवडा.

73.

क्रमणिकेतील विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय निवडा

2, 4, 3.5, 6.5, 5.0, 9.0, 6.5, 12.5, 8.0, 14, ...

74.

पुढील मालिकेच्या 5 व्या जागेसाठी तर्कदृष्ट्या उचित प्रतिमा निवडा :

75.

पुढील मांडणीतील रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत प्रतिमासंच निवडा

निर्णयक्षमता आणि प्रसंगाधारित प्रश्न (प्रश्न क्रमांक 76 ते 80) :

76.

तुमच्या भागातील लोक संस्कृती व परंपरा यांच्या नावाखाली ध्वनी व हवा प्रदूषणासंबंधातील न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही,

77.

तुम्ही एका संस्थेत अध्यापक व संशोधक म्हणून काम करता आहात, तुम्ही सादर केलेल्या मागणीच्या आधारे मोठ्या औद्योगिक गटाने दिलेल्या निधीतून तुम्ही एका संशोधन प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहात. या प्रकल्पात तुमच्या देखरेखीखाली अनेक कनिष्ठ संशोधक त्यांच्या डॉक्टरेट पदवीसाठी काम करत आहेत. एक स्त्री संशोधिका तुम्ही तिला पदवी मिळवून द्यावी अशी मागणी करत आहे. तुम्ही तिची मागणी पूर्ण केली नाही तर तुम्हाला लैंगिक छळाच्या बहाण्याखाली तुरुंगात टाकण्याची धमकी तिने दिलेली आहे. 

78.

तुम्ही जिल्हा अधिकारी आहात आणि तुमच्याकडे शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल केलेल्या लोकांच्या गटाकडून तक्रार आली आहे. हे पालक अल्पसंख्य, दलित व गरीब कुटुंबांतील आहेत. जरी शाळा  व्यवस्थापनाने या मुलांना प्रवेश दिलेला असला तरी इतर मुले त्यांना छळतात. परिणामी ही लहान मुले शाळेत उपस्थित रहायला तयार नसतात. तुम्ही,

79.

पाच दिवसांच्या सुटीत तुम्ही दुर्गम ग्रामीण ठिकाणी राहणा-या मित्राला भेटण्यासाठी आला आहात. भटकत असताना तुम्हाला वाटेत त्या भागातील विधानसभा सदस्याच्या व्यवस्थापनाखाली चालणारी निवासी आश्रम शाळा लागली. तुमचा मित्र हा विधानसभा सदस्य प्रमुख असलेल्या अन्य संस्थेचा कर्मचारी आहे. ही शाळा मुख्य रस्त्यापासून तसेच गावच्या वस्तीपासून दूर आहे. तुम्ही शाळेच्या आवारात गेलात आणि तुम्हाला शाळेच्या ओट्यावर सहा मुले बसलेली दिसली. इतर सर्व खोल्यांना टाळी लावली होती व आसपास कोणीही नव्हते. चौकशी केल्यावर तुम्हाला समजले की ती त्या शाळेची मुले असून ती त्यांच्या पालकांची त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी वाट पाहत आहेत. ती मुले अन्नाशिवाय दोन दिवस आहेत. ही मुले लाजाळू असलेल्या कोरकू समाजातील असल्याने गाववाल्यांना भेटून त्यांच्यात मदत करण्याची विनंती करण्याचे धाडस नाही. तुमचा मित्र स्वत:च्या नोकरीची काळजी असल्याने तुम्हाला या मुलांना त्यांच्या नशीबावर सोडण्याची आणि आवारातून त्वरित बाहेर पडण्याची विनंती करत आहे. तुम्ही, 

80.

पद्व्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी असलेल्या स्पर्धापरीक्षेला तुम्ही बसला आहात. अभ्यासक्रमाच्या जागांचे अर्जदारांच्या संख्येशी गुणोत्तर 1: 256 आहे. तुम्हाला प्रवेश मिळेल अशी मोठी आशा आहे. तुमच्या वर्गातील परीक्षा लिहिणाच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना इतरमार्गाचा अवलंब केल्यामुळे पकडले गेल्यामुळे पर्यवेक्षकाशी वाद घालायला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांविरुद्ध विरुद्ध तक्रार केली आणि केंद्रप्रमुख समस्येची चौकशी करण्यासाठी आले आहेत. तुम्हाला उत्तरे लिहिण्यात एकाग्रता साधणे कठीण जात आहे. तुम्ही

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.