राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या :
           1784 साली इमॅन्युएल कांट ने “प्रबोधन म्हणजे काय ?” हा ग्रंथ लिहिला. त्याने स्पष्ट केले की प्रबोधन म्हणजे माणसाची स्वत:होऊन स्वीकारलेल्या जोखडातून मुक्तता. हे जोखड म्हणजे दुस-याने आदेश दिल्याशिवाय आपल्या आकलनसामर्थ्याचा वापर करण्यास असमर्थ असणे. विवेकबुद्धीच्या कमतरतेमुळे नव्हे, तर तिचा वापर दुस-याचा आज्ञेशिवाय करण्याच्या भीतीमुळे हे जोखड स्वत:होऊन स्वीकारलेले असते. मानवजात इतक्या मोठ्या प्रमाणात आयुष्यभर या जोखडात राहते, याची प्रमुख कारणं म्हणजे आळशीपणा आणि घाबरटपणा. या कारणांमुळेच इतरांना त्यांचे तारणहार पालक म्हणून प्रस्थापित होण्याची संधी मिळते. अजाणतेपणात राहणे हे खूपच सोपे असते. ज्या पालकांनी मोठ्या कळवळ्याने त्यांच्यावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतलेली असते, ते अशी योजना करतात, की मानवजातीतल्या बहुसंख्य लोकांना जाणतेपणाकडे वाटचाल करणं हे धोकादायक वाटावं. या गरीब गुरांना एकदा का आपले मुके अनुयायी बनवले, आणि त्यांना गाड्याला जखडून ठेवणाच्या जोखडाशिवाय हे निष्क्रिय जीव एकही पाऊल टाकणार नाहीत, याची खात्री पटली, की हे पालक त्यांना एकट्याने वाट चालण्यामधले धोके पटवून देतात. आता खरं म्हणजे हे धोके इतके काही मोठे नसतात, कारण काही वेळा पडले तरी पुन्हा उठून ते शेवटी एकट्याने वाटचाल करायला शिकतीलच, पण अपयशाच्या एखाद्या उदाहरणामुळे ते घाबरट होतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या जोखडापासून मोकळीक मिळवण्याचे प्रयत्न करायलाच भिऊ लागतात. “आपला विवेक वापरण्याचे धाडस करा !” हे प्रबोधनाचे घोषवाक्य आहे.'
               प्रबोधनाच्या या विचारांची परिणती फ्रेंच राज्यक्रांतीच्या राजकीय रणधुमाळीमध्ये झाली. पारंपरिक उतरंडीच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्था म्हणजेच फ्रेंच राजेशाही, सरदारमंडळींचे विशेष हक्क, कॅथलिक चर्चचे राजकीय हक्क आणि अधिकार, हे सगळे उध्वस्त झाले. मानवी विवेकाच्या तत्त्वांवर आधारलेल्या आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य आणि समता या प्रबोधनकालीन ध्येयानी भारलेल्या अशा सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेने तिची जागा घेतली. यातूनच ज्यांच्यावर राज्य केले जाते त्यांच्या संमतीवर आधारलेल्या अशा राज्यव्यवस्थेच्या मूलभूत आराखड्याचा उदय झाला. त्याचा स्वाभाविक परिणाम असा झाला की प्रत्येक वैध अशा राजकीय व्यवस्थेने व्यक्तीचे मूलभूत मानवी हक्क आणि धार्मिक विविधता यांना अबाधित राखून त्यांचा आदर करावा, अशी अपेक्षा करायला समाज शिकला.

1.

माणसाने जोखड स्वत:होऊन का स्वीकारलेले असते ?

2.

बहुसंख्य मानवजात आयुष्यभर जोखडाखाली का जखडलेली असते ?

3.

पुढीलपैकी कोणती बाब नव्या फ्रेंच व्यवस्थेचा पायाभूत घटक नव्हती ?

4.

प्रबोधनामुळे _____________ च्या पायावर आधारलेल्या राजसत्तेचा आराखडा उदयाला आला.

5.

प्रबोधनामुळे समाज कोणत्या अपेक्षा करायला शिकला ?

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 6 से 10 प्रश्नांची उत्तरे द्या :
              आता यापुढे आपण संकल्पना तयार कशा होतात ते पाहूया. प्रत्येक शब्द संकल्पनेत रूपांतरित होत असताना तो ज्या पूर्णतः व्यक्तिगत व एकल अनुभवातून जन्माला आला, त्या अनुभवाशी त्याने एकनिष्ठ राहणं अपेक्षित नसतं; किंबहुना त्या अनुभवाशी मिळत्या जुळत्या असंख्य अनुभवांशी त्याने संबंधित असणं गरजेचं असतं. हे असंख्य अनुभव म्हणजे अजिबात समान नसलेले, निव्वळ असमान अनुभव ! अनेक असमान गोष्टींच्या समानीकरणातून प्रत्येक संकल्पना जन्म घेत असते. जितक्या स्वाभाविकपणे एक पान पूर्णत: दुस-यासारखं नसतं हे निश्चित आहे, तितक्याच स्वाभाविकपणे हेही लक्षात येतं की 'पान' ही संकल्पना नानाविध फरकांना दुर्लक्षित करून आणि स्वच्छंदपणे व्यक्तिगत विशेषांना नाकारत निर्माण करण्यात आली आहे. याने असा समज उत्पन्न होतो की अनेक पानांव्यतिरिक्त निसर्गात एक (आदर्श) पान' आहे; ते पान ज्याने अन्य पानांसाठीचा कच्चा आराखडा म्हणून भूमिका बजावली, त्याला अनुसरून अन्य सगळी पानं विणली गेली, रंगवण्यात आली, मापण्यात आली, चितारली गेली... मात्र हे सगळं करणारे हात सराईत नव्हते, कुशल नव्हते. त्यामुळे कुठलीच रचना मूळ आराखड्याची योग्य, विश्वासार्ह आणि खरीखुरी प्रतिकृती बनू शकली नाही. आपण एखाद्या व्यक्तिला ‘प्रामाणिक' मानतो मग विचारतो की ‘आज तो इतकं प्रामाणिक कसा वागला ?' आणि आपलं नेहमीचं उत्तर असतं - त्याच्या प्रामाणिकपणामुळे प्रामाणिकपणा ! याचा अर्थ असा होतो की एका आदर्श पानामुळे अन्य पानं जन्माला आली. आपल्याला प्रामाणिकपणा या मूळ आणि शुद्ध स्वरूपातल्या गुणाविषयी तसूभरही माहिती नाही. पण आपल्याला निश्चितपणे असंख्य व्यक्तिगत व परिणामतः असमान कृती माहीत आहेत, ज्यांच्यातील भेदाची लक्षणं दुर्लक्षित करून आपण त्यांचे समानीकरण करतो व त्यांना प्रामाणिक कृती असे नाव देतो. सरतेशेवटी आपण त्यांच्यातील एका छुप्या/लपलेल्या सामान्य गुणाला प्रामाणिकपणा या नावाने स्वरूप देतो. आपण जसं स्वरूप तयार करून घेतो तशीच संकल्पनाही व्यक्तिगत आणि सत्य स्थितीला डावलून तयार करतो. निसर्गाला मात्र कुठलेच मूळ आराखडे, कुठलंच स्वरूप, कुठलीच संकल्पना, कुठलीच जाति ठाऊक नाही, असल्यास निव्वळ एक क्ष माहीत आहे जो आपल्यासाठी अज्ञेय, अनाकलनीय आणि दुरापास्त आहे. कारण, आपला व्यक्ती आणि जाति मधला विरोध हाही मानवरूपी आहे आणि तो वस्तूंच्या मूळ स्वरूपात जन्माला येत नाही; मात्र आपण हेही निश्चितपणे मानता कामा नये कि हा विरोध वस्तूंच्या मूळ स्वरूपाशी काहीच संबंध दाखवत नाही. तसं मानल्यास तेही एक कट्टरपणाचं द्योतक होईल आणि त्याविरुद्ध मत प्रस्थापित करणं जितकं अशक्य, तितकंच हेही प्रस्थापित करणं अशक्य होऊन बसेल.

6.

एखाद्या शब्दाचे संकल्पनेत केव्हा रूपांतर होते ?   

अ. जेव्हा त्याने एकल अनुभवाशी साधर्म्य दाखवणे अपेक्षित असते तेव्हा

 ब. त्याच्या प्रामाणिकपणा मुळे

 क. जेव्हा तो कधीही समान नसलेल्या घटनांशी साधर्म्य साधतो तेव्हा

 ड. सामान्यांना दुर्लक्षित करून           

7.

पानाची संकल्पना कशी तयार होते ? 

अ. व्यक्तिगत भेदांना स्वच्छंदपणे नाकारून 

ब. विविधतेला विसरून 

क. निसर्गत: 

ड. मूळ आराखड्याची प्रतिकृति बनवून 

8.

निसर्गाला जर संकल्पना अवगत नसतील तर काय माहीत असते ? 

अ. व्यक्ती आणि वास्तव

ब. वस्तूंचे मूळ स्वरूप

क. असमान वस्तूंचे समानीकरण

ड. ते दुरापास्त आणि अनिर्वचनीय आहे

9.

पानांच्या संकल्पनेशी साधर्म्य साधण्यासाठी एका-पानाला काय करावे लागते ? 

अ. व्यक्तिगत भेदांशी तादात्म्य साधणे

ब. विविधतेला नाकारणे 

क. विविधतेला विसरणे

ड. असमान वस्तूंचे समानीकरण

10.

कुठला अनुभव संकल्पना निर्माण करण्यास आधारभूत मानला जावा ? 

अ. मूळ अनुभव

ब. त्वरित अनुभव

क. समानीकरणाचे तत्त्व

ड. वरीलपैकी कोणतेही नाही .

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 11 ते 15 प्रश्नांची उत्तरे द्या :
                        बाटलीबंद पाण्याचे व त्यांचे पर्यावरणीय परिणाम
               पुढीलवेळी तुम्ही पाण्याची बाटली विकत घ्याल, तेव्हा क्षणभर थांबून विचार करा. तुम्ही अगदी सहजपणे एक लीटर बाटलीबंद पाण्यासाठी पंधरा रुपये खर्च करता परंतु यातील वस्तूस्थिती जाणून घेण्याचा कधीही प्रयत्न केला जात नाही. खरं तर या एक लीटर बाटलीबंद पाण्याकरीता तुम्ही चार हजार दोनशे पटीने अधिक पैसे खर्च करत आहात, कि जे पाणी तुम्हाला नळाद्वारे अत्यल्प किंमतीत मिळते.
               बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे अर्थशास्त्र नेहमीच मला गोंधळवणारे वाटते. अलिकडेच दिल्ली जलबोर्डाने नळ पाणी पुरवठ्याच्या दरामध्ये अगदी नगण्य वाढ केली, तर शहरी भागातील मध्यमवर्गीयांनी त्याविरोधात निराशेचा सूर लावला. दिल्ली जलबोर्डाने केलेली ही दरवाढ तीन लीटर पाण्याकरीता केवळ एक पैसा इतकी अत्यल्प होती. (दिल्ली जलबोर्ड एक हजार लीटर पाण्या करीता साडेतीन रुपये दर आकारते) तरी देखील शहरी लोकांना असे वाटते कि आपण यासाठी खूप पैसे देत आहोत.
            जगात बाटलीबंद पाणी उद्योगाची घोडदौड सतत सुरू आहे. ग्राहकांना या पाण्याची किंमत ही काही विशेष बाब वाटत नाही. सन 2004 मध्ये 154 अब्ज लीटर पाण्याचा वापर केला गेला. यापैकी भारताचा हिस्सा 51 अब्ज लीटर होता. वार्षिक सरासरी वाढीचा दर 40 टक्के गृहीत धरल्यास संपूर्ण भारत देशात सुमारे 1200 हून अधिक बाटलीबंद पाण्याचे उद्योग कार्यरत असून त्यांची उलाढाल 1800 कोटी रुपयांची आहे.
              जर तुम्हाला वाटत असेल कि बाटलीबंद पाणी शुद्ध व सुरक्षित आहे तर तुम्ही पुन्हा करण्याची हीच वेळ आहे. संयुक्त संस्थानासारख्या देशात कि जेथे अन्न व औषध प्रशासनाचे गुणवत्तेचे निकष अतिशय कठोर आहेत. तेथे देखील असे गृहित धरले जाते कि, जवळ जवळ 40 टक्के बाटलीबंद पाणी हे नळ अथवा पाइपद्वारे आलेले पाणी पुन्हा बाटलीबंद केले जाते.
              एक लीटर बाटलीबंद पाणी निर्मिती करीता पाच लीटर पाण्याची गरज असते, हे अतिशय धक्कादायक आहे. हेच दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास 154 अब्ज लीटर बाटलीबंद पाणी निर्मितीकरीता 770 अब्ज लीटर पाणी वापरावे लागते. हे पाणी 2004 साली जगात वापरलेल्या एकूप पाण्याइतके होते. किती प्रचंड अपव्यय आहे हा !
                याशिवाय बाटलीबंद पाण्याची अतिरिक्त छूपी पर्यावरणीय किंमत सुद्धा आहे. पॅसिफीक इन्स्टिट्यूट इन कॅलिफोर्निया यांच्या पाहणीनुसार बाटलीबंद पाण्यासाठी आवश्यक असलेले प्लॅस्टीक निर्माण करताना मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरावी लागते. एकट्या अमेरिकेत जवळ जवळ 26 अब्ज लीटर बाटलीबंद पाणी सन 2004 मध्ये वापरले गेले. यासाठी प्रक्रिया आणि वाहतुकीकरीता सुमारे 20 दशलक्ष पिंपे (बॅरल) खनिजतेल वापरले गेले. तसेच यामाध्यमातून जमा होणारा प्लॅस्टीक कचरा व वापरलेल्या बाटल्या यामुळे मोठ्या प्रमाणात भूजल दूषित होते व ही संपूर्ण प्रक्रिया जागतिक तापमान वृद्धीस कारणीभूत आहे.
                    बाटलीबंद पाणी उद्योगामुळे होणारे प्रचंड पर्यावरणीय नुकसान लोक विचारात घेणार का ? होय संयुक्त संस्थानातील अनेक हॉटेल्सनी आपल्या ग्राहकांना बाटलीबंद पाण्या ऐवजी फिल्टर केलेले पाणी देण्यास सुरूवात केली आहे. शहर नियोजन विभाग व प्रशासन देखील आता याकडे गांभीर्याने पाहू लागले आहे. अलिकडेच सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर गॅविन न्यूसम यांनी वटहुकूम काढून निर्देशित केले कि, शहरातील विविध विभाग, संस्था, कंक्राटदार व शहराचा निधी वापरणाच्या संघटनांनी जेथे नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो तेथे प्लॅस्टीक बाटलीतून पाणी पुरविण्यास बंदी घालावी. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी सांगितले कि स्थानिक रहिवाशांना एक लीटर बाटलीबंद पाण्याच्या किंमतीत नळाद्वारे एक हजार पाणी उपलब्ध होते.

11.

बाटलीबंद पाण्याची पर्यावरणीय किंमत काय आहे ?

अ. 20 दशलक्ष तेलाच्या पिंपांचा वापर

ब. - जागतिक तापमान वाढ .

क. भूजलाचे प्रदूषण

ड. निर्वनीकरण

12.

बाटलीबंद पाण्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी संयुक्त संस्थांनांनी खालीलपैकी कोणते निर्णय घेतले ? 

अ. उपहारगृहात फक्त शुद्ध केलेले पाणी देणे

ब. शहरातील विभाग, काम करणा-या संस्था व कंट्राटदारास बाटलीतून पाणी देण्यास शहराचा निधी वापरण्यास बंदी

क. नळाद्वारे जेथे पाणी पुरवठा केला जातो तेथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टीक बाटलीतून पाणी देण्यास बंदी.

13.

खालीलपैकी कोणते विधान प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा वापर करण्यासंबंधी बरोबर नाही ?

अ. जागतिक जल उद्योगधंदा घोडदौड करत आहे.

ब. भारतात 1200 बाटलीबंद पाण्याचे कारखाने आहेत.

क. संयुक्त संस्थानांत 50 टक्के बाटलीबंद पाणी नळाच्या पाण्याने पुन्हा बाटलीबंद केले जाते.

ड. प्लॅस्टीकच्या बाटल्यांच्या जमिनीत साठण्यामुळे भूजल प्रदूषण होते.

14.

1 लीटर बाटलीबंद पाणी उत्पादन करण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता असते 

15.

संयुक्त संस्थानांत दरवर्षी बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करण्यासाठी आणि त्याची वाहतूक करण्यासाठी किती पिंपे तेलची गरज असते ?

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 16 ते 20 प्रश्नांची उत्तरे द्या :
                गरीबीचे अनेक मार्ग आहेत विशेष महत्वाचे म्हणजे त्यापैकी बहुतांश हे नियंत्रणातील असतात. तीच बाब श्रीमंतीबाबतही म्हणता येईल. मला वाटते गरीबी आणि श्रीमंती दोन्हीही नष्ट करणे शक्य आहे आणि ते इष्टही आहे याबाबत काही शंका नाही. दोन्ही अनैसर्गिक आहेत, मात्र त्यांच्या नष्टतेसाठी कायदा नाही तर कामाकडेच लक्ष द्यावे लागेल.
              माझ्या दृष्टीने गरीबी म्हणजे योग्य पद्धतीने आवश्यक ते अन्न, निवारा व वस्त्र यांचा व्यक्ती किंवा कुटुंबांसाठीचा अभाव, अन्न पौष्टीकतेमध्ये भिन्नता आढळते. सर्वच माणसे मानसिकदृष्ट्या वा शारीरिकदृष्ट्या समान नसतात. म्हणूनच माणसांना समान गृहित धरणारा वा समान असावेत असे मानणारा कोणताही आराखडा हा अनैसर्गिक व कृतित न आणता येणारा असतो. सर्वाना एका पातळीवर आणणे ही प्रक्रिया शक्य व इष्ट नाही, असा प्रयत्न ही गरीबीलाच प्रोत्साहन देऊन - अपवादात्मक करण्याऐवजी सार्वत्रिक ठरेल. कार्यक्षम उत्पादकास अकार्यक्षम होण्याची सक्ती केल्याने जसे अकार्यक्षम उत्पादक कार्यक्षम होत नाही, तसे हे आहे. मुबलक उपलब्धतेमुळेच गरीबी दूर होऊ शकते. सध्या आपण उत्पादन तंत्रशास्त्रात नैसर्गिक विकास म्हणून बरीच प्रगती केली आहे. ज्या दिवशी उत्पादन आणि वितरण हे इतके शास्त्रीय होईल की सर्वांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे व उद्योगाप्रमाणे उपलब्ध होईल.
               टोकाचे समाजवादी अशा मनाचे आहेत की उद्योग - हे अंतिमत: कामगारांची पिळवणूक करतील. मात्र आधुनिक उद्योग विश्व हे कामगारांना आणि जगाला हळू हळू वरच्या पातळीवर नेत आहे. आपल्याला केवळ नियोजन व कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक आहे. वैयक्तिक पुढाकार आणि कल्पकता यासह हुशार नेतृत्व यामुळेच सर्वोत्तम परिणाम साध्य होईल.
             मूलतः नकारात्मक असणारे शासन कोणत्याही ख-या रचनात्मक कार्यक्रमासाठी (उपक्रमासाठी) सकारात्मक मदत देऊ शकत नाही. समाजावरील बोजा थांबविणारी आणि प्रगतीच्या मार्गातीले अडथळे दूर करणारी मदत नकारात्मक असू शकते. गरीबीच्या मुळाशी असणारी कारणे म्हणजे सत्तामार्ग व तिचा वापर, शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रातील उत्पादन आणि वितरण यातील वाईट तडजोडी होय.

16.

गरीबी व श्रीमंती हे दोन्ही ______________ आहेत.

17.

गरीबी चा व्याख्या, पुढीलपैकी कोणती बरोबर आहे ?

18.

अनैसर्गिक व अंमलात आणता न येणा-या नियोजनात काय गृहित धरले आहे ?

19.

समाजवाद्यांच्या मते :

20.

परिच्छेदावर आधारित पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? 

अ. सरकार मूलत: नकारात्मक असते.

ब. सरकार सकारात्मक मदत देऊ शकते.

क. सरकार नकारात्मक मदत देऊ शकते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.