राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

पुढे माहिती घटकांचा संच दिला असून त्यापुढे कार्यवाही सुचवल्या आहेत. त्यासंबंधातील सर्वात उचित पर्याय निवडा.
1.शेतक-यांच्या आत्महत्या ही नेहमीचीच बाब झाली आहे.

2. बदलत्या हवामानामुळे त्यासंबंधीच्या सर्व अटकळी विचित्र होत आहेत, त्यामुळे शेती करणे जिकीरीचे झाले आहे.

3. माध्यमे ग्राहकांची बाजू घेऊन वाढत्या किमतींचा बागुलबोवा उभा करण्यात आघाडीवर असतात.

4. अचूक निदानावर बेतलेली दूर संवेदक शेती, पोषण शेती, सुरक्षित अन्न निर्माण करणारी शेती, वायरलेस शेती, जलवायू चलाख शेती, बदलता खत वापर शेती, वात आलेखन, उत्पादन आलेखन, जल गुणवत्ता आलेखन शेती, इत्यादी अनेक नवीन कृषि पद्धति व्यवहारात येत आहेत, परंतु यासंबंधी शेतकरी सजग नाहीत.

कृतिक्रम:

अ. नव्या कृषिपद्धतींचा वापर करून सुरक्षित अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी शेतक-याला सक्षम करण्यासाठीबुद्धिमान, तंत्रकुशल, कामसू व प्रामाणिक कृषि साहाय्यकांची फळी शासन, स्वयंसेवी संस्था व कृषि विद्यापीठे यांनी सहभागाने सज्ज केली पाहिजे.
ब. शेतकरी, स्वयंसेवी गट व ग्राहक यांनी पुढाकाराने व सहभागाने गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे रास्त किंमत मिळण्याच्या दृष्टीने वितरण केले पाहिजे आणि याबरोबरीने शासनाने हवा, जल, माती यांचे स्रोत, विविध परिस्थितिकी यांची गुणवत्ता टिकवणारी धोरणे आखून त्यांची हानी टाळली पाहिजे.

क. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी त्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी, झटणा-या राजकीय पक्षांना शासनाने सढळ हाताने साथ दिली पाहिजे, कारण त्यामुळे ते स्वत:ची प्रगती साधू शकतील.

62.

वर्गातील 43 विद्याथ्र्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगिज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवल आहेत. 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगिज भाषेसाठी नावे नोंदवली आहेत. जर वर्गात नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी दोनपैकी किमान एक भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, पण पोर्तुगिजसाठी नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. 

63.

सोबतची चौरसात अंतर्लिखित असलेल्या वर्तुळाची व चौरस अंतर्लिखित असलेल्या मोठ्या वर्तुळाची आकृती अभ्यासा आणि लहान वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर दर्शवणारा पर्याय निवडा.

image

64.

सुनील ने द.सा.द.शे. 12-5 दराने र 16,000, 3 वर्षाच्या मुदतीने विहिरीवर पंप बसविण्यासाठी चक्रवाढ व्याजाने कर्जाऊ घेतले. हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असते, तर दोन्ही प्रकारच्या व्याजात किती फरक पडला असता ?

65.

दिलेल्या माहितीच्या संदर्भात उचित पर्याय निवडा. 

A, B व C या बागा एका सपाटीवर आहेत पण एका रेषेत नाहीत. A व B या बागांतील अंतर 40 किमी आहे आणि A व C या बागांतील अंतर 110 किमी आहे.

राशी X = B व C या बागांतील अंतर

राशी Y = 60 किमी

66.

एका कॅनमध्ये A आणि B या दोन द्रावणांचे मिश्रण 7 : 5 या प्रमाणात आहे. जेव्हा त्यातील 9 लिटर मिश्रण । काढून घेतले आणि B द्रावणाने तो कॅन पूर्णपणे भरला तर A आणि B चे प्रमाण 7: 9 झाले. तर त्या कॅनमध्ये सुरुवातीला A चे द्रावण किती असेल ?

67.

सहा घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात. आणि अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील ?

68.

प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा.

image

69.

प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा.

जर p/q = 5/4, तर 3p + 2q/3p - 2q = ?

70.

जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाच्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.

71.

पौगंडावस्थेत तुम्ही एक उत्साही ढोलवादक होता. व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यात गुंतल्यामुळे आतापर्यंतच्या काही वर्षांत तुम्ही तो वाजवलेला नाही. सध्या तुमच्याकडे ध्वनीप्रदूषणासह शहराच्या प्रदूषण समस्यांची सोडवणूक करण्याचा कार्यभार आहे. पुढच्या महिन्यात साजच्या होणा-या उत्सवात ढोल वाजवण्यासाठी व त्याचा सराव करण्याची परवानगी मागण्यासाठी तरुण व्यक्तींचा एक गट तुमच्याकडे आला आहे. त्याचप्रमाणे तरुण व्यक्तींचा दुसरा गट वैज्ञानिकरीत्या गोळा केलेल्या पुराव्यांसह शहरातील ध्वनीप्रदूषणाची समस्या घेऊन तुमच्याकडे या पूर्वीच आलेला आहे. तुम्ही,

72.

तुम्ही एका शासकीय संघटनेला सेवा देणा-या रुग्णालयाचे प्रमुख आहात. एका कर्मचा-याकडून तुमच्याकडे लेखी तक्रार आली असून त्यात त्याने त्याचा घसा खूप दुखत आहे आणि गेले तीन दिवस त्याने घट्ट आहार घेतला नसल्याचे लिहिले आहे. पुढे त्याने लिहिले आहे की दोन कारणांमुळे त्याला योग्य सेवा मिळू शकलेली नाही; एक म्हणजे तो आरक्षित वर्गातील आहे आणि दुसरे म्हणजे तो कोणत्याही उच्च पदावर काम करत नाही. प्रमुख म्हणून या तक्रारीत काही तथ्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. गोष्टी सरळ करण्यासाठी तुम्ही,

73.

अलीकडेच तुम्ही लोकांनी स्वतःची तंबाखू व दारूची व्यसने सोडून आणि आरोग्यपूर्ण जीवन जगावे म्हणून स्वपुढाकाराने साहाय्य देण्यास सुरुवात केली आहे. लोक मित्र, नातेवाईकांमुळे कुतूहलापोटी आणि आनंद मिळवण्यासाठी तंबाखू वा दारूचे व्यसन करतात असे तुम्हाला एक तिहाइत व्यक्ती म्हणून नेहमीच वाटत होते. परंतु सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करणारे बहुसंख्य लोक असह्य दुर्गंधी, घाण हाताळतांना डोक्यात भरणारी शिसारी व सतत अनुभवावी लागणारी अस्वस्थता यांचा ताण व आजार यांचे व्यवस्थापन करण्यासाठी या सवयी लावून घेतात. यामुळे त्यांच्या त्रासाचा पुनर्विचार तुम्ही परभावाने केला. यापुढे तुम्ही,

74.

ग्रामीण भागातील लोकांना नवोपक्रम उपयुक्त ठरावेत आणि त्यांना चांगली शासकीय सेवा द्यावी हे ध्येय असलेल्या शासकीय मोहिमेचे तुम्ही प्रमुख आहात. तुम्हाला मदत करण्यासाठी व्यवस्थापन शाळांत शिकणाच्या अनेक तरुणांची भरती केलेली आहे. या व्यक्ती उत्साही आहेत, त्या चमकदार कल्पना मांडतात, त्या तंत्रज्ञानाचे उत्तम आकलन असलेल्या, वाक्पटुत्व व संप्रेषण कौशल्यांचा वापर करून आश्चर्यचकित करणारी सादरीकरणे करणाच्या आणि दांडग्या आत्मविश्वासाने स्वत:चे म्हणणे मांडणाच्या आहेत. पण याचवेळी त्यांच्यापैकी बहुसंख्यांनी त्यांचे सर्व जीवन शहरात घालवल्यामुळे, ते उत्तम सांपत्तिक स्थितीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने, त्यांना विविध चणचणींसह व सामाजिक गंडांमुळे कसेबसे जीवन जगणाच्या लोकांच्या दैन्यावस्थेची फारच अल्प जाणीव आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांच्या जीवनाचे त्यांच्या संदर्भातील वास्तव अनुभवून त्याचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्यांना स्वतःचे जीवन चांगले बनवण्यासाठी पुढाकार घ्यायला मदत देण्यासाठी आवश्यक असणारा धीर व चिकाटी यांचा या नवोदितांकडे अभाव आहे. तुम्ही,

75.

विविध राज्यांतील संस्थांच्या प्रमुखांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी असलेल्या समितीचे तुम्ही एक सदस्य आहात. कार्यक्रमाची व कामाच्या वेळापत्रकाची रचना करत असताना, काही सदस्यांनी समितीने यजमान कचेरीला सर्व सदस्यांसाठी, त्या ठिकाणाहून 300 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध देवळाची भेट आयोजित करण्याची विनंती करावी, अशी सूचना केली आहे. तुम्ही,

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.