STI Main 2014 - Paper 1

STI Main 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

'मी नाग पाहिला.' या वाक्यातील 'नाग' शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते ?

42.

 'मला गेह नाही.' या वाक्यातील गेह' या शब्दाचा अर्थ सांगा.

43.

जयचंदी घोडचूक' या म्हणीचा अर्थ काय असेल ? पुढील पर्यायांतून अचूक पर्याय निवडा.

44.

'पाणी पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून अचूक निवडा.

45.

'एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होते.' - या अर्थाची कोणती म्हण आहे ?

खालील पर्यायांतून अचूक पर्याय निवडा. 

46.

तंबाखू' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ? 

47.

खालीलपैकी 'कमळ' या शब्दाचे तीन पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे, तो कोणती ? 

48.

खालीलपैकी तीन शब्द समानार्थी असून एक शब्द त्यांचा समानार्थी नाही, तो कोणता ? ते लिहा.

49.

पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द कोणता ?

50.

'पंतप्रधानांनी राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व सांगितले. या केवलवाक्याचे मिश्रवाक्यात कसे रूपांतर होईल ? 

पुढील पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.

51.

शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरांतील व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

52.

विधाने - वाक्यांचे त्यांच्या अर्थानुरोधाने विविध प्रकार होतात, ते पुढीलप्रमाणे -

अ. वाक्यातील होकारार्थी विधानाला ‘अकरणरूपी वाक्य' म्हणतात.

ब. 'माझे वडील परगावी गेले नाहीत हे उदाहरण करणरूपी वाक्य प्रकाराचे' आहे. 

क. 'तू मुंबईस केव्हा जाणार आहेस ?' हे विधानार्थी वाक्य आहे.

वरील विधानातील पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर लिहा.

53.

“भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला' या केवलवाक्याचे मिश्रवाक्यात पुढीलप्रमाणे रूपांतर होईल. अचूक पर्याय निवडा.

54.

पर्यायी उत्तरांतील - वाक्यातील कृदंत असलेले वाक्य ओळखा.

55.

खालील विसंगत जोड्यातील सुसंगत असलेले, चारही जोड्या योग्य असलेले पर्यायी उत्तर कोणते ?

खालील उतान्यावरील प्रश्न क्र. 56 ते 60 या प्रश्नांची पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तरे लिहा.
            लोक मला मोठे म्हणतात किंवा लोकमताच्या आरशात मी जेव्हा मोठेपणाचे प्रतिबिंब पाहतो त्यावेळी मी अधिकच अंतर्मुख बनतो. तो माझ्या स्वभाव-धर्माचाही परिणाम असू शकेल. परंतु मोठेपणाच्या व्याख्येत वैयक्तिक मोठेपणा याला काही अर्थ नाही असे मला नेहमी वाटते. समाजाची काही मूल्ये असतात. अधिकारावर असलेल्याला सामान्य माणसे मोठे म्हणतात. पण हे खरे मूल्य नव्हे. खरेपणा त्यात कमी असतो. त्याला भलावण म्हणता येईल. मला वाटते, खरा मोठेपणा हा विचारांचा, प्रगत परिणामांचा असतो. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामांचे असते. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामाच्या मोठेपणाशीच प्रामुख्याने निगडित आहे. मी स्वतः कधी मोठेपणाचा विचार करीत नाही. मोठेपणाचा शोध माणसे नंतर घेतात आणि तसाच तो घेतला पाहिजे. नंतर म्हणजे मनुष्य नजरेसमोरून दूर झाल्यानंतर ! तेव्हा त्याचे जे मूल्यमापन होईल ते खरे मोठेपण. समाजासाठी, समाजाचे जीवन बदलण्यासाठी केलेल्या कामात त्याला यश किती आले, त्याने कोणते ध्येय स्वीकारले होते आणि त्यात त्याला किती यश मिळाले, मार्गदर्शक विचार त्याने मागे किती ठेवले या मोठेपणाच्या कसोट्या असल्या पाहिजेत.
                कोणतीही परीक्षा असो, ती एक प्रकारची कसोटीच असते. आपले मर्यादित ज्ञान या कसोटीवर पारखून घेण्यात जे यशस्वी होतात त्यांना एक प्रकारची आपल्या गौरवाची व आत्मविश्वासाची प्रचीती येते. आपले जीवन योग्यप्रकारे व्यतीत करता यावे, आणि त्याचबरोबर आपले कुटुंब, समाज, राष्ट्र आणि मानवता यासंबंधीची आपल्यावर पडणारी कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडता यावीत म्हणून आधुनिक काळात आपल्याला अनेक परीक्षा देऊन आवश्यक ते ज्ञान मिळवावे लागते.
                जीवन हीच मुळी एक मोठी परीक्षा असून ती चांगल्या रीतीने उत्तीर्ण होण्यासाठी अतिशय परिश्रम करावे लागतात. आपली जीवननौका योग्य मार्गावर ठेवण्यासाठी सतत जागरूक राहून आपल्या शक्तीचा आपण कार्यक्षमरीत्या पुरेपूर उपयोग केला नाही तर ती प्रवाहामध्ये वाहून जाते आणि आपण प्रवाहपतित बनतो. परिस्थितीवर ज्याला विजय मिळविता येत नाही तो तिचा गुलाम बनतो आणि आपल्या दुर्भाग्याला दोष देत राहतो. म्हणून परीक्षेत यशस्वी होणे अतिशय महत्त्वाचे असते.

56.

खालील विधाने वाचा व योग्य तो पर्याय निवडा. 

अ. जीवन हीच मुळी एक मोठी परीक्षा आहे. 

ब. जीवनपरीक्षा पास होण्यासाठी अतिशय परिश्रम करावे लागतात. 

57.

आपणांस कोणत्या संबंधीची कर्तव्ये पार पाडावी लागत नाहीत ? 

58.

खालील विधाने पहा : 

अ. लोकमताच्या आरशात लेखक मोठेपणाचे प्रतिबिंब पाहतात. 4

ब. मोठेपणाच्या प्रतिबिंबामुळे लेखक अंतर्मुख बनतात. 

क. मोठेपणाच्या व्याख्येत वैयक्तिक मोठेपणाला बराच काही अर्थ आहे, असे लेखकांला वाटते.

59.

पुढील विधाने पहा : 

अ. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामांचे असते.

ब. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामाच्या मोठेपणाशीच प्रामुख्याने फारकत घेते.

60.

लेखकांचे विचार खालीलपैकी कोणत्या विचारसरणीशी जुळते मिळते आहेत.

अ. लेखक स्वतः कधी मोठेपणाचा विचार करीत नाहीत. 

ब. मोठेपणाचा शोध माणसे नजरेसमोर असतानाच घेतात.

क. मोठेपणाच्या कसोट्या ह्या समाजजीवन यशस्वी करण्यासाठी असाव्यात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.